नागपूर :- राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे दहाही झोनमध्ये प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही सर्व अर्ज स्वीकृती केंद्र शनिवार १३ जुलै आणि रविवारी 14 जुलै रोजी सुरू राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
शनिवार १३ जुलै व रविवारी 14रोजी मनपाची अर्ज स्वीकृती केंद्र सुरु ठेवण्यात येत असल्यामुळे महिला लाभार्थी यांना या दोन शासकीय सुट्टीच्या दिवशीही संबंधित मदत केंद्रावर अर्ज दाखल करता येतील. योजनेच्या सर्व महिला लाभार्थींनी अर्ज सादर करण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे. ‘नारी शक्ती दूत’ ॲपवरूनही महिलांना स्वत: अर्ज करता येईल. उपायुक्त (समाज विकास विभाग) डॉ रंजना लाडे यांनी सांगितले की मनपाच्या दहा झोन मध्ये 7671 अर्ज जमा झाले आहे. यामध्ये 6224 अर्ज ऑफलाईन तर 1447 आनलाईन जमा करण्यात आले आहे. तसेच विधानसभा निहाय आंगणवाडी येथे 30761 अर्ज जमा झाले आहे. दोन्ही मिळुन 38432 अर्ज जमा करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस मोठ्या संख्येत महिलांनी अर्ज करावे, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
येथे जमा करा अर्ज
लक्ष्मीनगर झोन
प्रभाग क्रमांक १६ : मनपा समाज भवन, गजानन नगर, नागपूर
प्रभाग क्रमांक ३६ : मनपा प्राथमिक आरोग्य केंद्र पांडे लेआउट, नागपूर
प्रभाग क्रमांक ३७ : बुध्द विहार, कामगार कॉलनी, नागपूर
प्रभाग क्रमांक ३८ : मनपा समाज भवन, प्रगती सोसायटी, जयताळा, नागपूर
धरमपेठ झोन
प्रभाग क्रमांक १२ : मकर धोकडा मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक १३ : हजारी पहाड, मराठी, मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक १४ : प्रियदर्शनी, मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक १५ : नेताजी मार्केट मनपा शाळा, नागपूर
हनुमान नगर झोन
प्रभाग क्रमांक २९ : योगाभवन, मनपा नागपूर
प्रभाग क्रमांक ३१ : लालबहादूर शास्त्री मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक ३२ : दुर्गानगर मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक ३४ : हनुमान मंदीर, समाज भवन, मनपा, नागपूर
नेहरूनगर झोन
प्रभाग क्रमांक २६ : मराठी उच्च प्राथमिक शाळा, मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक २७ : संत ज्ञानेश्वर समाज, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक २७ : नेहरूनगर झोन कार्यालय, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक २८ : राजबाळ मराठी प्राथमिक शाळा, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक ३० : गणेश मंदिर, मनपा नागपूर
गांधीबाग झोन
प्रभाग क्रमांक ८ : फुटबॉल ग्राउंड, अंसारी नगर, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक १८ : गांधीबाग झोन कार्यालय, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक १९ : हंसापुरी खदान हायस्कुल, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक २२ : अण्णाभाउ साठे वाचनालय, मनपा, नागपूर
सतरंजीपुरा झोन
प्रभाग क्रमांक ५ : सतधम्म बुदधविहार, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक २० : हिंदी प्राथमिक शाळा, मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक २१ : सतरंजीपुरा झोन कार्यालय, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक २१ : शांतीनगर प्राथमिक शाळा, मनपा शाळा, नागपूर
लकडगंज झोन
प्रभाग क्रमांक ४ : संत कबिर मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक २३ : समाज भवन
प्रभाग क्रमांक २४ : मराठी उच्च प्राथमिक शाळा
प्रभाग क्रमांक २५ : मनपा महारानी लक्ष्मीबाई शाळा, मनपा शाळा, नागपूर
आशीनगर झोन
प्रभाग क्रमांक २ : कपिल नगर, प्राथमिक शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक ३ : समाज भवन, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक ६ : राणी दुर्गावती प्राथमिक शाळा, दुर्गावती चौक, नागपूर
प्रभाग क्रमांक ७ : बाळाभाउपेठ, आर सी एस सेंटर, नागपूर
मंगळवारी झोन
प्रभाग क्रमांक ११ : झिंगाबाई टाकळी, मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक १ : जरीपटका नारा आरोग्य नागरी सुविधा केंद्र, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक ९ : आरोग्य नागरी सुविधाकेंद्र, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक १० : हनुमान मंदीर, पचकमेटी एकता नगर, बोरगाव, गोरेवाडा, रोड, नागपूर