महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाच्या तयारीला वेग

Ø जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा

Ø आढावा बैठकीला आमदारांची उपस्थिती

Ø स्टेड, मंडप उभारणीच्या कामाला गती

Ø व्यवस्थेसाठी मंडपाचे 25 सेक्टरमध्ये विभाजन

यवतमाळ :- यवतमाळ शहरानजीक किन्ही येथे मोकळ्या मैदानात दि.24 ऑगस्ट रोजी आयोजित महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे. महसूल भवन येथे आज आ.मदन येरावार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी तयारीचा आढावा घेतला.

बैठकीला आमदार व जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम उत्तमपणे पार पाडण्यासाठी तब्बल 26 समित्या नेमण्यात आल्या आहे. त्यात कार्यक्रम स्थळ, समन्वय, स्वागत व्यवस्था, मान्यवर व महिलांची वाहतूक व्यवस्था, भोजन व्यवस्था, अधिकारी समन्वय समिती, लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, स्टॅाल व्यवस्थापन, रांगोळी व सजावट, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता व पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था, तांत्रिक व्यवस्थापन, ओळखपत्र व पासेस, आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण समिती आदी समित्यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी समिती प्रमुखांकडून त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या समितीच्या कामाचा आढावा घेतला. गावस्तरावर महिलांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. बसमध्येच महिलांना खाद्य पदार्थ देण्यात येणार आहे. त्याचे व्यवस्थित नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था राहणार आहे.

कालपासून कार्यक्रमस्थळी स्टेज, मंडप व स्टॅाल उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. याठिकाणी होणारी वाहनांची गर्दी पाहता पार्कींगचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी वाहनांची गर्दी होणार नाही, यासाठी पोलिस विभागाने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या. कार्यक्रम मंडपाचे सोईसाठी एकून 25 सेक्टर करण्यात येणार आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये पाणी, डॅाक्टरसह औषधीसाठा, बसण्याची सुटसुटीत व्यवस्था राहतील.

प्रत्येक सेक्टरनिहाय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून हे पथक त्या त्या सेक्टरचे व्यवस्थापन सांभाळणार आहे. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या महिलांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, याचे व्यवस्थित नियोजन करण्याची सूचना आ.मदन येरावार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

Thu Aug 22 , 2024
यवतमाळ :- सोयाबीन पिकावर विषाणूजन्य पिवळा मोझॅइक रोगाचा दरवर्षी कमीअधिक प्रमाणत प्रादुर्भाव दिसून येतो. असा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिवळा मोझॅइकची लक्षणे : रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळ्या रंगाचे छोटे-छोटे चट्टे दिसतात, त्यानंतर पानावर चमकदार पिवळ्या हिरव्या रंगाचे मोठ्या आकारचे चट्टे दिसतात व पाने पिवळ्या रंगात बदलतात. झाडे खुरटी व खुजी राहतात. रोगग्रस्त झाडाला फुलोरा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com