वातावरणातील बदल उपाययोजनांच्या कृती कार्यक्रमाला गती मिळणार; राज्यातील शहरांसाठी ‘क्लायमेट फॅारवर्ड महाराष्ट्र’ उपक्रम राबविण्याचे आवाहन – प्रधान सचिव प्रवीण दराडे

मुंबई :- केंद्रसरकारच्या 15 व्या वित्त आयोगानुसार शहराच्या पर्यावरण विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीचा वापर करून महाराष्ट्रातील 43 अमृत शहरांमध्ये वातावरणीय बदल उपाययोजना कृती आराखडे तयार करून या कार्यक्रमास गती द्यावी ‘क्लाइमेट फॉरवर्ड महाराष्ट्र’ हे ध्येय साध्य करण्याचे आवाहन पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी केले.

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्यावतीने महाराष्ट्रातील 43 अमृत शहरांमध्ये वातावरणीय बदल कृती कार्यक्रमास गती देणे व महाराष्ट्रातील शहरांची डीकाब्रोनाइजेशन रूपरेषा ठविण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांसह ‘क्लाइमेट फॉरवर्ड महाराष्ट्र’ या उपक्रमांचे अनुषंगाने कार्यशाळेचे आयोजन आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील 43 अमृत शहरांमध्ये वातावरणीय बदल कृती कार्यक्रमास गती देणे (Accelerating Climate Action in ४३ AMRUT Cities, WRI India) व महाराष्ट्रातील शहरांची कार्बननिरास (डीकार्बोनाइजेशन) रूपरेषा बनविणे (City Decarbonization Roadmap of Maharashtra. C४०) या दोन या उपक्रमाचे उद्घाटन प्रधान सचिव दराडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

या संदर्भात नागरी भागांसाठीची वातावरणीय बदल कृती कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून ती तातडीने राबविण्यासाठी ‘डब्लू. आर. आई. इंडिया (WRI India) आणि सी-40 सीटीज क्लायमेंट लीडरशिप गृप (C४० Climate Leadership Group) या दोन संस्थांसोबत करारा करण्यात आला.

दराडे म्हणाले की, माझी वसुंधरा अभियानांतर्गत हे उपक्रम राबविण्यात येणार आहे. पर्यावरण विभागांतर्गत पर्यावरण सुरक्षा, प्लास्टिक वेस्ट कमी करणे,हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी सर्व महानगर कृती आराखडा तयार करावा. वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने आपापल्या शहरांमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने मिशन मोडवर काम करून हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत ग्राम स्तरावर हे उपक्रम राबवून याबाबत जनजागृती करवी.या उपक्रमासाठी पर्यावरण विभागाच्यावतीने आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रधानमंत्री यांनी २०७० पर्यंत भारताचे “नेट झिरो इमिशन” (“निव्वळ शून्य उत्सर्जन म्हणजेच “कार्बन न्यूट्रल”) करण्याचे उद्दिष्ट जाहीर केलेले आहे. प्रधानमंत्री यांनी जाहीर केलेले कार्बन न्यूट्रल उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, भारतातील सर्व राज्यांनी वातावरणीय बदल कृती कार्यक्रमावर तसेच, कार्बन न्यूट्रल होण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

केंद्र शासनाची ध्येय धोरणे व कार्यक्रम राबविण्यात महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यानुसार, आताही पर्यावरण आणि वातावरणीय बदलावर काम करण्यात पुढाकार घेऊन वाटचाल करण्याची महाराष्ट्र राज्याची महत्त्वाकांक्षा आहे. भारत सरकारच्या नेट-झिरो ध्येयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रात वातावरणीय बदल कृती-केंद्रित रूपरेषा तयार करण्यासाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग हा विविध आंतरराष्ट्रीय संस्थांकडून तांत्रिक सहाय्य घेत आहे. त्यामध्ये, ‘डब्लू. आर. आई. इंडिया’ (WRI India)आणि ‘सी-40 सीटीज क्लायमेंट लीडरशिप ग्रुप (C४o Climate Leadership Group) या संस्थांचा समावेश आहे. त्यानुसार, महाराष्ट्राच्या वातावणीय बदलावरील नियोजनात पुढील वाटचाल करण्याची सुरुवात राज्यातील ४३ अमृत शहरांपासून करण्यात या आंतरराष्ट्रीय संस्था मदत करणार आहेत.

‘सी-40 सीटीज च्या विभागीय संचालक श्रुती नारायणन, डब्लू. आर. आई. इंडिया’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव पै, इंडिया क्लायमेंट कॉलबरेटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्लोका दास,डब्लू. आर. आई. इंडिया’चे महेश हारहरे,राज्यातील महानगर पालिकेचे आयुक्त यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आ. शेलार यांची माहिती

Tue May 16 , 2023
मुंबई :- भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे १७ व १८ मे रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. १८ मे रोजी पुणे येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थींशी संवाद, बुद्धीमंतांशी संवाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आ.आशीष शेलार यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!