फरार महीला आरोपीस अटक

नागपूर :- आरोपी महिला क. १) मुन्नी मकसुद पठान, वय ४५ वर्ष, रा. ताजनगर, गल्ली नं. २, अजनी, नागपूर हिने तिची साथीदार क. २) शिल्पा सुरेश हावरे, वय २२ वर्षे, रा. हिलटॉप, अंबाझरी हिचे सोचत संगणमत करून आपले राहते मरी, स्वतःये आर्थिक फायदयाकरीता, एका पिडीत अल्पवयीन मुलीस पैश्याचे प्रलोभन दाखवुन, देह व्यापार करण्यास प्रवृत्त केले व स्वतः ये गरी जागा व ग्राहक उपलब्ध करून देवुन ग्राहकाकडुन पैसे घेवुन, देह व्यापार करून घेतांना समक्ष मिळुन आली. याप्रकरणी सरकार तर्फे फिर्यादी सपोनि. रेखा संकपाळ सा.सु.वि. गुन्हेशाखा, नागपूर यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे अजनी येथे आरोपीविरुष्द कलम ३७०(अ), ३७२, ३७६ (२) (जे) भा.द.वि. सहकलम ४, ८, १७ पोक्सो अॅक्ट, सहकलम ३, ४, ५. पिटा अॅक्ट गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपी क. १ हिला दिनांक १५.०७.२०२१ रोजी अटक करण्यात आली होती. गुन्हा पडल्यापासुन आरोपी क. २ हि मिळुन आलेली नव्हती. नमुद प्रकरणी आरोपी क. १ हिचे विरुध्द मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल होते. त्यामध्ये तिला शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. आरोपी क २ हिचे विरुध्द फरारी दोषारोपपत्र सादर करण्यात आलेले होते.

गुन्हेशाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून सापळा रचुन नमूद महीला आरोपीस दिनांक २८.११.२०२४ से १४.०० वा. अंबाझरी हद्दीतुन ताब्यात घेतले. आरोपीची विचारपुस केलो असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. नमुद महीलेस पुढील कार्यवाहीस्तव अजनी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर,  संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर,  राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, महा पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि शिवाजी नन्नावरे, नापोअं, शेषराव राऊत, अश्वीन मांगे, समिर शेख, कुणाल मसराम, मपोहवा. अनुप यादव व मपोअं पुनम शेंडे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Fri Nov 29 , 2024
  नागपूर :- शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत, दारूबंदी कायद्यान्वये ०२ केसमध्ये एकुण ०२ ईसमावर कारवाई करून २३,०४०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०१ केसमध्ये एकुण ०१ ईसमावर कारवाई करून १,४६५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ६.३५६ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३,९४,१५०/- रू. तडजोड शुल्क […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com