फरार आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले.
नागपूर – पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांचे आदेशान्वये संपुर्ण जिल्हयात पाहिजे असलेले आरोपी यांची मोहीम सुरू असतांना आपल्या मार्गदर्शनात नागपूर उपविभागात पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत असतांना गोपनिय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन बोरी येथील अप. क्र. 111/2009 कलम 406, 411 भादंवि. अन्वये पोलीस स्टेशन बोरी येथे गुन्हा नोंद झाला होता. या गुन्हयातील आरोपी नामे- प्यारू शेख अहमद अली रा. कुतुब शहा नगर हा आजपावेतो फरार असुन सदरचा आरोपी हा पोलीस स्टेशन अंबाझरी हद्दीतील रवि नगर येथील भरत नगर सौजन्य अपार्टमेंट फ्लॅट नं. 203 येथे आपले अस्तित्व लपवुन राहत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी हा त्याचे राहते घरी दिनांक 04/04/2023 रोजी असल्याची गुप्त माहिती बातमीदाराव्दारे स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील स्टाफ यांना माहिती प्राप्त झाल्यावरून त्यांचे माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक ओमप्रकाशकोकाटे यांचे मार्गदर्षनात सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, सहायक फौजदार गडेकर, अरविंद भगत, दिनेश आधापुरे, निलेश बर्वे, नरेंद्र पटले, पोलीस नायक बालाजी, अजीज, सायबर सेलचे पोलीस नायक सतिश राठोड, महिला पोलीस नायक स्वाती हिडोरीया, चालक पोलीस शिपाई आशुतोष यांचेसह पोलीस स्टेशन अंबाझरी हद्दीत सापळा रचुन फरार आरोपी प्यारू शेख अहमद अली रा. कुतुब शहा नगर याला ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारून शहानिशा केली असता त्याने आपले नाव प्यारू शेख अहमद अली रा. कुतुब शहा नगर असे सांगितलेवरून तसेच आरोपीचा नमुद गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन बोरी यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, सहायक फौजदार गडेकर, अरविंद भगत, दिनेश आधापुरे, निलेश बर्वे, नरेंद्र पटले, पोलीस नायक बालाजी, अजीजशेख, सायबर सेलचे पोलीस नायक सतीश राठोड, महिला पोलीस नायक स्वाती हिडोरीया, चालक पोलीस शिपाई आशुतोष यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.