अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे 3 हजार 501 कोटी जिल्ह्यांना सुपूर्द

वाढीव मदतीबाबत निर्णयानंतर शासन निर्णय जारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदतीचा दिला होता शब्द

मुंबई :- जून जुलै ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल सांगितले होते आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयही घेण्यात आला होता. राज्यातील ठिकठिकाणच्या पूरग्रस्तांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कुणाही नुकसानग्रस्तास वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगितले होते.

त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून मिळून 3 हजार 501 कोटी निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली असून मदत व पुनर्वसन विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे.

वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13600 प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येईल

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

४ हजारावर निवडणूक केंद्रात रविवारी आधार जोडणी अभियान

Sat Sep 10 , 2022
 नागरिकानी बीएलओशी संपर्क साधण्याचे आवाहन नागपूर दि ९ :-  रविवारी 11 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील चार हजारावर निवडणूक केंद्रामध्ये निवडणूक कार्ड सोबत आधार जोडणी अभियानासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय नव मतदारांना नोंदणी करणे, नाव वगळणे, यासाठी सुद्धा प्रत्येक केंद्रावर कर्मचारी रविवारच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनी केले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com