अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचं समर्थन नाहीच! पण ‘हे’ शब्दही… फडणवीसांचा इशारा कुणाला?

मुंबई :- राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात होत्या, आंदोलन करत सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात होती. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्या अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून केली जात असून सत्तार यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्या विधानाला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. एकूणच भाजपच्या वरिष्ठ नेत्याने अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा विरोध करत राजकारण खूप खालच्या थराला जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

कोणीही महिलांबद्दल अपशब्द बोलू नये, ते अतिशय चुकीचे आहे, आम्ही त्याचा विरोध करू अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, जशी आमच्या लोकांना लागू आहे तसे त्यांच्याही लोकांना लागू आहे. मला त्याच्यामध्ये जायचे नाही, राजकारणात आचारसंहिता पाळली गेली पाहिजे असं मत फडणवीस यांनी मांडले आहे.

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचे मी समर्थन करणार नाही, पण खोके आणि अजून काय काय असं म्हणत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

त्यामुळे दोन्ही बाजूने आचारसंहिता पाळली गेली पाहिजे, राजकारणात पातळी खूप खालच्या स्तरावर गेली असून दोन्ही बाजूच्या मोठे नेत्यांनी हे सांगितले पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र पुलिस में ट्रांसजेंडर को मिलेगा आरक्षण! MAT का सरकार को निर्देश 

Tue Nov 8 , 2022
मुंबई :- महाराष्ट्र में पुलिस फोर्स में हर एक जेंडर की भागीदारी बढ़ाने के लिए जल्द ही बड़ा कदम उठाया जाने वाला है. दरअसल, महाराष्ट्र एडमिनिस्ट्रेटिव ट्रिब्यूनल (MAT) की मुंबई पीठ ने राज्य सरकार को Police Sub-Inspector (PSI) का एक पद ट्रांसजेंडर के लिए आरक्षित रखने का निर्देश दिया है. MAT की अध्यक्ष एवं सेवानिवृत्त न्यायमूर्ति मृदुला भाटकर ने सोमवार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com