बाबा रामदेव च्या महिला विरोधी वक्तव्या वरती आम आदमी पार्टी महिला विंगचा रोष
नागपूर :- योग गुरु रामदेव बाबा यांनी महिलांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने आम आदमी पार्टी नागपूर महिला विंगचे धरण आंदोलन. हे आंदोलन आम आदमी पार्टी संयोजक कविता सिंगल यांच्या नेतृत्वात सदर रेसिडेन्सी रोड स्थित पातंजली फार्मसी समोर करण्यात आले. या आंदोलनात प्रामुख्याने युवा राज्य समिती सदस्य कृतल आकरे, नागपूर संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, दक्षिण नागपूर महिला संयोजक मेघा वाकोडे, पश्चिम नागपूर महिला संयोजक अलका पोपटकर, दक्षिण पश्चिम महिला उपाध्यक्ष पुष्पा डाबरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
आम आदमी पार्टी नागपूर महिला विंग तर्फे सदर पोलीस स्टेशन मध्ये रामदेव बाबा यांच्या विरोधात आईपीसी कलम ३५४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात यावा अशी तक्रार देखील करण्यात आली.
योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी महिलांविषयी वादग्रस्त विधान केले. “महिला साडी नेसल्यावर आणि सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात. काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात.” असे ते म्हणाले. महिलांबाबत असा दूषित दृष्टिकोन ठेवणे अत्यंत चुकीचे असून यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी आणि इतर स्त्रिया तिथे उपस्थित होत्या तरीही कोणी त्यांच्या विरोध केला नाही. महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेला धक्का पोहचवणारे त्यांचे वक्तव्य लाजिरवाणे आहे असे शहर अध्यक्षा कविता सिंघल यांनी सांगितले.
यावेळी रोशन डोंगरे, लक्ष्मीकांत दांडेकर, पीयूष आकरे, प्रभात अग्रवाल, प्रदीप पौनीकर, अमेय नारनवरे, नरेश महाजन, अब्दुल सलाम, विशाल वैद्य, शुभम मोरे, सौरभ दुबे, मानसिंग अहिरवार, किशन नीमजे, नासिर शेख, वंदना निमजे, नीलिमा नारनावरे, शुभांगी वळेकर हरीश वळेकर संजय बारापात्रे, प्रतीक्षा गौर, संजय गौर, हे पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.