सेवायोजन कार्यालयाकडे नावनोंदणी केलेल्या युवकांना आधार लिंक करण्याचे आवाहन

नागपूर  : जिल्ह्यातील नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार युवकांनी अद्यापही आपल्या सेवायोजन कार्डला आधार कार्ड जोडले (लिंक) केलेले नसेल अशा सर्व उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपली संपूर्ण माहिती (जसे पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल, शिक्षण इत्यादी) भरावी, जेणेकरून महास्वंयम पोर्टलवरील सर्व योजनांचा आपणास लाभ घेता येईल व ऑनलाईन अधिसूचित केलेल्या पदासाठी अर्ज करता येईल.

प्रत्येक उमेदवाराने आपल्या नाव नोंदणीस आधार कार्ड जोडणे (लिंक करणे) व माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे अन्यथा उमेदवार अनेक संधीपासून वंचित राहू शकतो, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.ग.हरडे यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

10 फेब्रुवारी पासून हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम                 

Thu Feb 9 , 2023
गडचिरोली :- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोगाचे दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिम गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी व आरमोरी या तालुक्यात दिनांक 10 फेब्रुवारी ते दिनांक 20 फेब्रुवारी 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे.सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेअंतर्गत राज्यातील हत्तीरोगासाठी संवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्हयात डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळया सोबतच आयव्हरमेक्टीनची तिसरी मात्रा गरोदर माता, 5 वर्षा खालील बालके व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com