कोळशा खदान येथे शुल्क भांडणाने युवकाची हत्या..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कन्हान : – पोलिस स्टेशन अंतर्गत कोळसा खदान नं. ६ पानी टाकी जवळ सुनिल चुन्नीलाल केवट (निषाद) आणि त्याचा मित्र आकाश राजेश राजभर रा खदान न ६ यांचे शुल्क भांडण झाल्यावर सुनिल घरी आल्यावर आकाश त्याचे मागेच घरी येऊन चाकुने छातीवर वार करून गंभीर जख्मी करून आकाश ने सुनिल ची हत्या केली. अशी कन्हान पोस्टे ला बहिन संगिता सुशिल केवट च्या तक्रारीने पोलीसानी आरोपी आकाश राजभर ला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

सोमवार (दि.२) ऑक्टोबंर ला दुपारी २ वाजता इंदर कॉलरी कोळसा खदान नं.६ पानी टाकी जवळ किरायांच्या घरी बहीन संगिता सुशिल केवट व वडिल चुन्नीलाल केवट (निषाद) हे घरी असताना सुनिल चुन्नी लाल केवट (निषाद) वय १९ वर्ष बाहेरून आपल्या घरी आला. व त्याचे मागेच आकाश राजेश राजभर वय २० वर्ष देखील चाकु घेऊन आला आणि आकाश च्या पाठोपाठ त्याची आई पुष्पा आणि वडील राजेश राजभर हे देखील आले. आकाश राजभर याने सुनील शी मारहाण करण्यास सुरुवात केली. पाहुन बहीन संगिता, वडील चुन्नीलाल, आकाश राजभर ची आई व वडील राजेश चौघेही आकाश राजभर ला सुनील पासुन वेगळे करत होते, तेव्हा आकाश राजभर याने त्याच्या कडील धारदार चाकु काढुन सुनील च्या छाती वर मारल्याने सुनील गंभीर जख्मी होऊन रक्तस्त्राव होऊन तो खाली पडला. तेव्हा बहिनी ने ताबडतोब पती सुशिल ला बोलावुन शेजाऱ्यांच्या मदतीने वडील व पती यानी सुनील ला घराशेजारी राहणाऱ्या मोंटुच्या ऑटो रिक्षात बसवुन कामठी येथील शासकीय दवाखा न्यात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी सुनील ला तपासुन मृत झाल्याचे सांगितले. नंतर बहीन संगीता ला भाऊ सुनील च्या मित्रा कडुन समजले की, सुनील चे त्याच्या घराजवळ राहणारे आकाश राजभर सोबत भांडण झाले होते. आणि भांडण संपवुन सुनील घरी आला होता. यामुळे भाऊ सुनील केवट (निशाद) याच्याशी आकाश राजभर चे झालेले शुल्क भांडणातुन आकाश राजभर याने घरी येऊन सुनील च्या छातीवर धारदार चाकुने वार करून गंभीर जख्मी केल्याने सुनील चा मृत्यु झाला. अशी तक्रार बहिन संगिता सुशिल केवट हिने कन्हान पो स्टे ला केल्याने पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, सपोनि चव्हाण, हेकॉ जयलाल सहारे, कोमल खैरे ,अनिल यादव सह पोलीस कर्मचारी घटना स्थळी पोहचुन पंचनामा करुन आरोपी आकाश राजेश राजभर यास अटक करित हत्या चा गुन्हा नोद करून पुढील तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहते पुढील तपास करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आजनी येथे महात्मा गांधी आणि शास्त्रीजींना अभिवादन.

Mon Oct 2 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी –  तालुक्यातील आजनी येथे सावित्रीबाई ज्योतीराव फुले निःशुल्क अभ्यासिका आणि वाचनालयाच्या वतीने जयंती निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्व. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. अभ्यासिकेतील विद्यार्थिनी गुंजन वानखेडे हिच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले तर कामगार कवी लीलाधर दवंडे यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या बद्दल माहिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com