संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगढ परिसरात 9 एप्रिलला आयोजित समारंभात केटरिंग च्या कामावरील मित्रात शिवीगाळ केल्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने दुसऱ्या दिवशी 10 एप्रिलला रात्री 9 वाजता जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील गोयल टॉकीज चौक येथे आयोजित कार्यक्रमात येऊन एकमेकांना अश्लील शिवीगाळ देऊन देव बार समोर आले असता विधिसंघर्ष आरोपीपैकी एकाच्या डोक्यावर बॉटल फोडून जख्मि केंल्याची घटना घडली असता उपस्थित विधिसंघरशीत आरोपीतानी आपल्या हातातील स्टील च्या चाकूने बॉटल मारणाऱ्या तरुणांच्या पोटावर व पाठीवर सपासप वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना 10 एप्रिल ला रात्री दहा दरम्यान घडली. गंभीर जख्मि तरुणाचे नाव रितीक मनोज डोंगरे वय 24 वर्षे रा तेलिपुरा कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच एपीआय हिवरकर यांनी त्वरित घटनास्थळ गाठून दोन्ही जख्मि ला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता जख्मि रितिक डोंगरे ची परिस्थिती नाजूक असल्याने नागपूर च्या मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेत 18 वर्षीय तरुणाने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी रितीक डोंगरे वय 24 वर्षे रा तेलिपुरा कामठी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1),352 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दुसऱ्या घटनेत 17 वर्षीय बाबा महल्ले ले आउट येरखेडा कामठी ने दिलेल्या तक्रारी वरून आरोपी विधिसंघर्ष तरुण विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109(1),115(2)296 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.