संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 1 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कळमना मार्गावरील रणाळा मार्गावर दुचाकी अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेला काही तास ओलटत नाही तोच रणाळा-भिलगाव मार्गावरील ओलम्पियाड स्कुल समोरून मध्यरात्री दीड दरम्यान पायी जात असलेल्या तरुणाला मागेहून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून मृतक तरुणाचे नाव श्रावण सिंदपुरी वय 40 वर्षे रा हल्ली मुक्काम भिलगाव असे आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर मृतक हा मूळचा तुमसर चा रहिवासी असून मागिल 15 वर्षांपासून भिलगाव येथे वास्तव्यास असून अजूनही अविवाहित होता तसेच व्यवसायाने बेलदारी चे काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करायचा.व एकटाच वास्तव्यास होता. काल मध्यरात्री दीड दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी घटनेची नोंद करीत अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच मृतकाच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे