तरुण शेतकऱ्याची झाडाला गळफास लावून आत्महत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड मार्गावरील कॅनलच्या बाजूला असलेल्या कविट च्या झाडाला पिवळ्या रंगाच्या नॉयलॉन रस्सी च्या सहाय्याने एका 38 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 8 वाजता निदर्शनास आली असून मृतक तरुण शेतकऱ्याचे नाव सुशांत उर्फ पप्पू प्रकाश यादव वय 38 वर्षे रा यादव नगर कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक तरुण शरीराने हष्टपुष्ट असुन शेतीव्यवसाय करायचे.काल रात्री यादव नगर च्या राहत्या घरी घरमंडळी सह जेवण करून झोपी गेले असता अचानक रात्री 11 वाजता घरमंडळींना शेतात जाण्याचे कारण सांगून स्वतःकडे असलेली बुलेट क्र एम एच 40 सी एल 5086 ने घोरपड मार्गावर असलेल्या शेतात गेला तर अज्ञात कारणावरून सकाळी 8 वाजता सदर घटनास्थळाच्या मार्गावर बुलेट उभी करून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला नॉयलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

या मार्गाने सकाळी मॉर्निंग वॉकिंग करणाऱ्या नागरिकाना हे दृश्य बघताच एकदम आश्चर्याचा धक्का बसून सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव सहकारी पोलीस कर्मचाऱ्याशी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा केला.व मृतदेहाला पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकोय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात हलवीत मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करीत कन्हान नदी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात असून मृतकाच्या पाठीमागे आई, वडील, मोठा भाऊ, वहिनी,पत्नी व एक मुलगा व एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरमालकानेच किरायदाराच्या दुकानाचे कुलूप तोडले ! - पत्रपरिषदेत लांजेवार यांची न्यायासाठी धाव

Tue May 21 , 2024
नागपूर :- गैर अर्जदार यांनी जबरदस्तीने रात्री 2 वाजता च्या सुमारास गैर कायद्यांची मंडळी जमवून (गुंड) यांच्यामार्फत दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील सामान बाहेर फेकून दिले व सायकली चोरून नेल्यात -जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झालेली आहे. माझ्या दुकानाचे कुलूप गैर कायदेशीर रित्या तोडून सीसीटीव्ही कॅमेरे फोडून व सायकली चोरून नेल्या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये न्यायासाठी धाव घेतली. असा आरोप खुशाल श्रीरामजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com