नागपूर :- यातील आरोपी सुरज सावरकर हा आय एक्स ग्लोबल (IX ACADEMY PRIVATE LIMITADE) कंपनीत ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडींग, शेअर्स मार्केट, क्रिप्टो मार्केट यांचे एज्युकेशन देण्याचे काम करत असुन यातील फिर्यादी व फिर्यादीचे मित्रांना ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडींग मध्ये गुंतवणुक केल्यास ५ ते १५ टक्के नफा मिळतो. अशी बतावणी करून आरोपीने दिलेल्या पि.आर. ट्रेडर्स, एम. आर. ट्रेडर्स, आर. के. ट्रेडर्स, ग्रिन व्हॅलीअॅग्रो, टि.एम. ट्रेडर्स सर्व कॅनरा बँक कोलकत्ता शाखा, चे वेगवेगळे अकाउंट नंबर देवुन त्यामध्ये टि.पी. ग्लोबल, एफ.एक्स. या ब्रोकर वेबसाईटवर पैसे गुंतवण्याकरीता टाकण्यास सांगीतले. त्यानुसार त्यांनी पैसे टाकले. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे मित्रांनी पैसे विड्रॉल करण्याकरीता टि.पी. ग्लोबल फॉरेक्स ब्रोकर वेबसाईटवर रिक्वेस्ट टाकली असता अद्याप पावेतो गुंतवणुक केलेली रक्कम परत मिळाली नाही. फिर्यादीची व त्यांचे मित्रांची फसवणूक झाली आहे.
फिर्यादीचे रिपोर्टवरून पो. ठाणे नंदनवन अप. क्रं. ९४/२०२४ कलम ४२०, ४०६, ३४ भा.दं.वि. सहकलम ६६ (ड) माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारणा) २००८ सहकलम ३ एम.पी. आय. डी. (MPID) अॅक्ट १९९९ अन्वये दाखल करण्यात आला आहे. तांत्रीक तपास व गुप्त माहितीच्या आधारे गुन्हयातील पाहीजे आरोपी डॉ. प्रिती निलेश राउत जि. वर्धा हीचा शोध घेतला असता सदर आरोपी महिला मिळुन आल्याने तिला ताब्यात घेवुन अटक करून पी. सी. आर. कामी न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र पवार व सहा. पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण यांचे पथकाने केली आहे.