अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा रासायनिक तंत्रशास्त्र विभाग आणि विकास विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ‘हॅन्ड मेड पेपर कन्वर्शन’ विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेला उद्घाटक म्हणून माजी प्राचार्य डॉ.ए.बी. मराठे, तर अध्यक्षस्थानी रासायनिक तंत्रशास्त्र विभागप्रमुख डॉ.ए.बी. नाईक उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना डॉ.ए.बी. मराठे यांनी सद्यस्थितीत संपूर्ण जगात असलेल्या पेपरचा वापर, कागदाचे विविध प्रकार व त्यांचे वाढते महत्व तसेच पेपरलेस वर्क याविषयी सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणातून विभागप्रमुख डॉ.ए.बी. नाईक यांनी महाराष्ट्र शासनाने प्लॅस्टिकवर बंदी असल्यामुळे पेपर टेक्नॉलॉजीचे समाजात असणारे स्थान व त्यामुळे विद्याथ्र्यांना उद्योग क्षेत्रात मिळणाऱ्या नोकरीच्या संधीबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व संचालन डॉ. प्रशांत शिंगवेकर यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ.पी.के. वानखडे यांनी मानले. नंतरच्या सत्रात तिवारी यांनी हॅन्ड मेड कागदापासून विविध वस्तू बनवण्याची कला सादर केली व प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांकडून करवुन घेतले. विभागातील जावरकर व नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना पेपर बॉक्स, पेपर पाकीट, फुलदाणी आदी वस्तु बनवण्याची कला अवगत करुन दिली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी मुर्तीकार अविनाश रोतळे यांनी कागदाच्या लगदयापासुन विवीध प्रकारच्या मुत्र्या व इतर वस्तू कशा तयार कराव्यात, याचे सादरीकरण केले. याप्रसंगी थोर पुरूष तसेच इतर देव-देवतांचे कागदाच्या लगद्यापासुन मुर्ती बनवतांना विद्याथ्र्यांनी उत्फूर्त प्रतिसाद नोंदविला. दुपारच्या सत्रात यवतमाळच्या आगरकर यांनी हॅन्ड मेड कागदापासुन विवीध प्रकरची फुले व त्यांना रंग कसा द्यायचा, याचे प्रात्यक्षिकाद्वारे आकलन करून दिले.
समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ.एस.व्ही. आगरकर यांनी हॅन्ड मेड पेपर पासुन बनविण्यात येणाऱ्या विवध वस्तुंमुळे कशाप्रकारे व्यवसाय सुरु करू शकतो व त्याला विभागाद्वारे कशी मदत मिळू शकते, याबाबत सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. सेलूकर यांनी हॅन्ड मेड पेपर कन्वर्शनचे महत्व व त्याचे व्यावसायीक स्वरुप, याबद्दल माहीती दिली. प्रास्तविक व संचालन प्रा.दिव्या रायचूरा हिने, तर आभार प्रा. किरण बाहे यांनी मानले. कार्यशाळेला अमरावतीतील विविध नामाकिंत महाविद्यालयांतील तसेच विद्यापीठाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.