मनी बी इन्स्टिट्यूटतर्फे अम्रितकाल “व्हिज्युअलायझिंग @ १००” अंतर्गत दिल्ली येथे झाली केंद्रीय बेजटवर द्वि-दिवस कॅानक्लेव!

दिल्ली :-मनी बी इन्स्टिट्यूट प्रायवेट लिमिटेड व एस.एल. लॅा यांच्या संयुक्त विद्यमाने अम्रितकाल ही कॅानक्लेव आपण आता दिल्ली येथे घेतली. अम्रितकाल “व्हिज्युअलायझिंग @ १००” ह्या अंतर्गत केंद्रीय बेजटवर चर्चा द्वि-दिवस कॅानक्लेव महाराष्ट्र सदन दिल्ली येथे केली. आज पर्यंत आपण मनी बीच्या माध्यामातुन जागतिक स्तरावर ऑनलाइन शिकवत होतो. ॲाफलाईन मोडमध्ये नागपुरात आज पर्यंत अनेक कार्यक्रम घेतले पण देशाच्या राजधानीत अश्या प्रकारचा कार्यक्रम करायला मिळाला ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

कॅानक्लेवचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॅा. भागवत कराड यांनी केले ते प्रामुख्याने सत्रात उपस्थित होते. बजेट ज्यांनी बनवले ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते. डॅा. कराड यांनी विस्तृतपणे बजेट आणि विश्लेषण कार्यक्रमाच्या दरम्यान मांडले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सोबत राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर देखील उपस्थित होते. पेनलिस्ट म्हणुन पहिले इंडीया फाउंडेशनच्या निरूपमा सौदरराजन, दिल्ली हायकोर्टच्या सिनीयर अ‍ॅड. निलीमा त्रिपाठी, स्मिता रॅाय, गगन कुमार देखील उपस्थित होते.

मागील अनेक वर्षापासुन आर्थिक क्षेत्रामध्ये मनी बी इंस्टीट्यूट काम करत असुन सामान्य जनतेला बजेट समजावे यासाठी प्रयत्नरत आहे. बजेट आले की काय स्वस्थ झाले? काय महाग झाले? करांमध्ये किती सवलती मिळाल्यात? यापलीकडे सहसा चर्चा होतांना दिसत नाही. पण बजेट हे सरेवसामान्यांचे असुन बजेटमध्ये होणारी प्रत्येक गोष्ट ही तुमच्या-आमच्या सोबत निगडीत आहे आणि तो सबंध काय आहे? कसा आहे? हे जुळऊन देण्याचा प्रयत्न या बजेट एनालिसिसचा कार्यक्रम मनी बी इन्स्टिट्यूटचे घेतं व समान्य जनतेपर्यंत अतिशय सोप्या भाषेत बेजेट पोहचविण्यात येते या करीता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मनी बी इन्स्टिट्यूटचे कौतुक केले व भविष्यात देखील अश्याच प्रकारची सामान्य जनतेमध्ये आर्थिक सक्षरता व बजेट जास्तीच जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याकरीता शुभेच्छा दिल्या.

कॅानक्लेवच्या दुसऱ्या दिवशी भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष व युवा खासदार तेजस्वी सुर्या प्रामुख्याने उपस्थित होते. सोबत सुप्रीम कोर्ट अ‍ॅड. अदिती दाणी, मनिषा करिया, चरण्या लक्ष्मीकुमारन उपस्थित होत्या.

तेजस्वी सुर्या ह्यांनी सांगितले की येणारे २५ वर्ष हे भारतासाठी अमृतकाळ आहे. अमृतकाळ युवापिढी समोर कशी येईल? कश्या पद्धतीने हे बजेट बनविले आहे. या जाहीर झालेल्या केंद्रीय बजेटमध्ये काय आहे? कोण-कोणत्या वर्गाला याचा फायदा होईल. अमृतकाळाचे हे पहिले बजेट आहे व येणाऱ्या पंचवीस वर्षांमध्ये भारत कश्या प्रकारे प्रगती करेल याबद्दल ते बोलले. तेजस्वीजींनी यावेळी मनी बी इन्स्टिट्यूटचे देखील कौतुक केले की गेल्या अनेक वर्षांपासुन सामान्य जनतेमध्ये आर्थिक साक्षरता व बजेट जास्तीच जास्त लोकांपर्यंत पोहचवित आहे. ही अतिशय चांगली क्रांती आहे.

भविष्यात अम्रितकाल “व्हिज्युअलायझिंग @ १००” अंतर्गत मनी बी इन्स्टिट्यूट संपुर्ण राज्यात राज्य सरकार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) यांच्या सोबत अश्या प्रकारचे कार्यक्रमे घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांना विविधक्षेत्रातील मान्यवर व तज्ञ मंडळींची उपस्थिती राहाणार असल्याची ग्वाही मनी बी इन्स्टिट्यूटच्या संचालिका शिवानी दाणी वखरे यांनी दिली.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आपत्ती व्यवस्थापनामध्ये सोशल मीडिया चा प्रभावीपणे वापर करावा - राज्य लोकसेवा हक्क आयोग आयुक्त अभय यावलकर

Thu Feb 16 , 2023
नागपूर : नैसर्गिक आपत्ती काळात व्हॉट्सॲपसह अन्य समाज माध्यमांचा उपयोग करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश आल्याच्या सकारात्मक घटना पाहता सोशल मीडिया हे आपत्तीचा सामना करण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते, असे प्रतिपादन राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त अभय यावलकर यांनी येथे केले.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर जिल्ह्यातील युवक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com