संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- प्रभाग क्र. ६ शंकर नगर कांद्री -कन्हान येथील ६२ वर्षीय आजी सिमा राकेश चव्हाण च्या १३ वर्षीय नातीन ला तिच्या घरा समोरील २६ वर्षीय विपिन उर्फ टिंक्या मुन्ना डोगरवार हा शाळेत ये-जा करताना तिच्या मागे फिरत असुन प्रेम करण्या विषयी बोलत होता. तिला घरी बोलावुन खोटया आमिषाने व चुकीच्या उद्देशाने घरात २ तास कोडुन तिला त्रास दिल्याने पोस्टे ला आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून अटक करित कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.
आजी सिमा राकेश चव्हाण, वय ६२ वर्षे, रा. प्रभाग क्र.६ शंकर नगर कांद्री कन्हान ता. पारशिवनी जि. नागपुर यांची १३ वर्षीय नातीन मागील २ वर्षा पासुन शिक्षण घेण्याकरिता तिच्या कडे राहत असुन ती इयत्ता ७ वी मध्ये शिकत आहे. तिचे आईवडील बिलासपुर, छत्तीसगड येथे स्वच्छता कामगार म्हणुन काम करतात. आजीच्या घरासमोर विपिन उर्फ टिंक्या मुन्ना डोगरवार, वय २६ वर्ष हा राहत असुन विपिन उर्फ टिक्या हा शाळेत ये-जा करताना तिच्या सामोर फिरत राहतो आणि प्रेम करण्याविषयी बोलतो. कधी कधी मागे येत असल्याने त्याची भीती वाटते असल्या ने त्याच्या बद्दल कोणालाही काही सांगितले नाही. रविवार (दि.११) ऑगस्ट ला दुपारी १२ वाजता घरा तील सर्व सदस्य घरी असताना १३ वर्षीय मुलगी बाहेर शेळ्यांना चारा देत असताना विपिन उर्फ टिंक्या मुन्ना डोगरवार याने हात इशाराने घराच्या दारातुन हाक मार ली. तेव्हा ती त्याच्याजवळ गेली आणि त्याने आत यायला सांगितल्याने ती आत गेली. बसायला काहीच नसल्याने ती बेडवर बसली. त्याच्या घरात कोणी दिस त नव्हते. काही वेळाने त्याचा मित्र गब्बर आला आणि साऊंड बॉक्सवर हिंदी गाणी वाजवु लागला. टिक्या ला फोन येताच दोघेही घरा बाहेर पडले. तिला बरे वाटत नसुन चक्कर येत होती, म्हणुन ती बसुन राहिली . तिने घरी जाण्यासाठी दरवाजा उघडला असता बाहे रून दरवाजा लावला होता. विपीन उर्फ टिंक्या याने तिला खोटया आमिषाने व चुकीच्या उद्देशाने दोन तास घरात कोंडुन ठेवल्याने घाबरल्याने काय करावे हे कळ त नसल्याने १३ वर्षीय मुलगी तिची आजी दिव्या संजय चव्हाण वय २० वर्षे. प्रभाग क्र.६ शंकर नगर कांद्री कन्हान च्या सोबत पोलीस स्टेशन कन्हान गाठुन विपिन उर्फ टिंक्या विरूध्द तोडी बयाण दिल्याने कन्हा न ठाणेदार पोनि उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस प्रतिभा डाखोळे हयानी आरोपी विपिन उर्फ टिंक्या विरूध्द अप क्र. ४८९/२०२४ कलम १२७ (१), ७८ बीएनएस २०२३ व कलम १२ बालकाचे लैगिक अपराधा पासुन संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून कन्हान पोलीस एपीआय प्रयाग फुलझेले हे पुढील तपास करित आहे.