विद्युत करंट लागुन अठ्ठाविस वर्षीय तरुणाचा मृत्यु

– महादुला येथील मोहने राईस मिल जवळील घटना

– विज वितरण कर्मचाऱ्याबरोबर काम करतांना घडली घटना

रामटेक :-  विज वितरण कंपनीचे महादुला येथील उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या परीसरातील एका डि.पी. स्ट्रक्चर वर चढुन काम करीत असतांना जंपर चा करंट लागुन बोरी येथील एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना आज दि. ३० नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव गौरव नगरारे वय २८ रा. बोरी असे असुन तो अविवाहीत होता.

प्राप्त माहितीनुसार, महादुला परीसरात असलेल्या मोहने यांच्या राईस मिल जवळच्या विद्युत डिपी स्ट्रक्चर वर काही बिघाड आला होता. तेव्हा विज वितरण कंपनीच्या एका कर्मचाऱ्यासोबत मृतक गौरव हा तेथे काम करण्यासाठी आला होता. गौरव हा एक खाजगी वायरमन होता. दरम्यान आज दुपारच्या सुमारास डि.पी. स्ट्रक्चर वर चढुन दुरुस्ती करतांना गौरव ला जंपर चा करंट लागला. तो दुर फेकल्या गेला. त्याच्या पाठिचा भाग भाजला होता. उंचावरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती. लगेच त्याला उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे दाखल करण्यात आले. तेथुन त्याला नागपुर ला रेफर करण्यात आले. दरम्यान मनसर च्या जवळपास गौरव ने प्राण सोडला. घटनेने विज वितरण विभागामध्ये खळबळ उडालेली असुन बोरी गावात शोककळा पसरलेली आहे.

विविध चर्चांना उत

गौरव हा खाजगी वायरमन होता. तो विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत फिरायचा अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली असुन असे असले तरी मात्र एका खाजगी वायरमन कडुन विज वितरण कंपनीची लाईन ची कामे करवुन घेता येते काय ? असे असेल तर मग विज वितरण च्या कर्मचाऱ्यांचे कार्य कोणते ? विज वितरण अभियंता तथा कर्मचाऱ्यांना एखादा खाजगी वायरमन कामावर ठेवता येते काय ? असे विविध प्रश्न नागरीकात उपस्थित केल्या जात.

कुणालाही न सांगता तो चढला – अभियंता माळी

याबाबद विज वितरण विभाग रामटेक ग्रामीण चे अभियंता माळी यांना विचारणा केली असता ‘ मृतक गौरव हा कुणालाही न सांगता डि.पी. स्ट्रक्चरवर चढलेला होता असे त्यांनी सांगीतले तसेच गौरव ला विभागाकडून नुकसान भरपाई मिळेल काय अशी विचारणा केली असता ‘ मी त्याबाबद कन्फर्मली काही सांगु शकत नाही ‘ असे त्यांनी सांगीतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवीन मतदार नोंदणीकरिता 6 व 7 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन

Thu Dec 1 , 2022
• जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक भंडारा :- भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आज 30 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली. महाविद्यालयामधील ज्या विद्यार्थ्यांचे वय दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com