संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
ट्रक्टर चालक विधी संघर्ष बालक असुन ७ लाख ३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील खंडाळा शिवारातिल गावातील रस्त्यावर अवैधरित्या वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर ट्राली पोलीस निरिक्षक विलास काळे सह सहकर्मी ने रात्री विभागीय गस्त (पैट्रोलिग) करित असताना पहाटेच्या सुमारास पकडुन ट्रक्टर चालक विधी संघर्ष बालक असुन सात लाख तीन हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खंडळा शिवारातील कन्हान नदीच्या सिहोरा घाट नदी पात्रातुन अवैध वाळु वाहतुक करित असल्याची गुप्त माहिती कन्हान पोलीसांना मिळताच कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या सह पोलीस सहकर्मी हयांनी नाकाबंदीचे नियोजन करून बुधवार (दि.५) ऑक्टोंबरच्या रात्री १२.५० वाजता सरकारी वाहन क्रंं एम एच ३१ डी झेड ४३१ ने विभागीय गस्त (पेट्रोलिंग) व तपास कार्यावर असतांना गुप्त बातमीद्वारा कडुन माहीती मिळाली की एक लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉली खंडाळा शिवार व महामार्गा कडुन कन्हानकडे रेती घेऊन जात आहे. अशा विश्वसनीय गुप्त माहीती वरून दोन पंचाना बोलवुन त्यांना रेती चोरी पकडण्याची माहीती देत आम्ही पोलीस व पंचासह खंडाळा शिवारात थांबले असता तिथे रोड वर एक लाल रंगाचा ट्रक्टर ट्रॉली क्रं एम एच ४०, सी एच ५५२२ येतांनी दिसला. त्यास थांबवुन त्या ट्रक्टर चालकला पंचा समक्ष त्यास नाव गाव विचारले असता सौरभ अरूण शेंडे वय १७ वर्ष राह. सालवा ( येसंबा) कन्हान असे सांगितले. सदर ट्रक्टर ची पाहणी केली असता ट्रक्टर ट्रॉली मध्ये एक ब्रास रेती अवैद्य रित्या बिना परवाना मिळुन आल्याने रेती कोणाची विचारली असता त्यानी समशेर इदर पुरवले वय ३४ राह. वाघधरे वाडी कन्हान यांचे सांगण्यावरून सिहोरा रेती घाट कन्हान येथुन आणल्याचे सांगीतले. सदर एक ब्रास रेती किंमत ३००० रू. व ट्रक्टर ट्रॉली किंमत ७ लाख रू.असा एकुण ०७ लाख ३ हजार रूपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचा समक्ष घटना स्थळावर जप्त करण्यात आला. तसेच आरोपी चालक सौरभ अरूण शेडे हा विधी संघर्ष बालक असुन त्याचे कडे वाहन चालविण्याचा परवाना मिळुन आला नाही. तरी आरोपी १) वाहन चालक सौरभ अरूण शेडे. व २) शमशेर इंदर पुरवले याच विरुद्ध कन्हान पोलीसानी अप क्रं ५७३/२२ नुसार कलम ३७९, १०९ भादंवि सह कलम ३/१८१, ५/१८१ मो वा का अन्वये गुन्हा नोद करून पुढील कार्यवाही पो.नि. विलास काळे करित आरोपी चा शोध घेत आहे.