अवैधरित्या रेती चोरीची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर ला पकडले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी फाटा जवळ गोंडेगाव कडुन टेकाडी कडे येणाऱ्या रोडवर अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर ला कन्हान पोलीसांनी पकडुन ट्रॅक्टर, ट्राली व एक ब्रास रेती सह एकुण सात लाख पाच हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पोस्टे कन्हान ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.

प्राप्त माहिती नुसार गुरूवार (दि.१०) नोव्हेंबर ला सकाळी ८:३० ते ९:३० वाजता दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले हे आपल्या स्टाफसह पोस्टे परिसरात दाखल गुन्ह्यातील आरोपीताचा शोध कामी सरकारी वाहनाने फिरत असतांना गुप्त बातमीदारा कडुन खबर मिळाली कि, गोंडेगाव कडुन टेकडीकडे येणाऱ्या रोड वरून एक ट्रॅक्टर च्या सहायाने ट्राॅली मध्ये अवैधरित्या रेतीची चोरी होत आहे. अशा विश्वसनीय मिळालेल्या खबरेवरून कन्हान पोलीस घटनास्थळी पोहचले असता पोलीसांना पाहुन ट्रॅक्टर चालक हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर सोडुन पळुन गेेला ट्रॅक्टरची पाहणी केली असता ट्रॅक्टर चा मुंडा क्रमांक एम एच ३१ ए जी ६१८९ किंमत ४,००,००० रु, ट्रॉली क्रमांक. एम एच ३१ झेड ३९५६ किंमत ३,००,००० रु. व एक बॉस रेती किंमत ५००० रु. असा एकूण ७,०५,०००/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला ट्रॅक्टर मालक आणि चालक यांच्या विरुद्ध कलम ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले हे करीत आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भंडारा शहरातील विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Sat Nov 12 , 2022
भंडारा दि.12 :- भंडारा नगर परिषदेकडून करण्यात येणा-या विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलिस अधीक्षक लोहित मतानी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. शहरातील नाशिकनगर भागातील मैत्रेय बुद्ध विहारातील ई- […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com