घोडपेठ येथे उभारणार अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा

– दिनेश चोखारे करणार सर्वोतोपरी मदत

 चंद्रपूर :- नागपूर मुख्य मार्गावर स्थित घोडपेठ येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुतळा उभारण्याची घोषणा नागरिकांनी केल्यानंतर दिनेश दादापाटील चोखारे यांनी घोषणेला उत्तर देत आपण सर्वतोपरी मदत करू लवकरच पुतळ्याचे काम पूर्ण करू असे ते म्हणाले.

घोडपेठ येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादापाटील चोखारे, धनकर महासंघाचे अध्यक्ष रमेश उरकुडे, ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रदीप देवगडे, गटनेते ईश्वर निखाडे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती मोरे, ज्ञानेश्वर घोरपडे, घोडपेठचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू शेरकी, अनिल घोटकर उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हरियाणातील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार  - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

Tue Oct 8 , 2024
– विकासासाठी जनतेला डबल इंजिन सरकारच हवे मुंबई :- हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश मिळवले असून हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार, महायुतीचा प्रचंड विजय होणार असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात  बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करणारा काँग्रेस पक्ष या निवडणुकीत उघडा पडला, असेही बावनकुळे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com