रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनपाची विशेष चमू गठीत, हॉट मिक्स प्लाँट विभागाचा पुढाकार

नागपूर :- नागपूर शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या हॉट मिक्स प्लाँट विभागाद्वारे विशेष चमू गठीत करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात सुसूत्रता यावी व वेळेत खड्डे बुजविले जावेत याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विभागाला निर्देश दिले होते. हॉट मिक्स प्लाँट विभागाद्वारे आता प्रत्येक झोन स्तरावर समन्वयक नेमून त्यांची जबाबदारी निश्चित केली आहे.

हॉट मिक्स प्लाँट विभागाचे कार्यकारी अभियंता अजय डहाके यांनी सांगितले की, रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनपाद्वारे विशेष पाच चमु गठीत करून साप्ताहिक वेळापत्रकानुसार झोननिहाय खड्डे बुजविण्याचे कार्य केले जात आहे. याकरिता प्रत्येक झोनमध्ये उपअभियंता यांना समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

२३ ते २५ जुलै २०२४ या कालावधीमध्ये मंगळवारी, धंतोली, गांधीबाग, आशीनगर आणि लकडगंज या पाच झोनमधील खड्डे बुजविण्यात येत आहेत. तर २६, २७ आणि २९ जुलै २०२४ या कालावधीत धरमपेठ, सतरंजीपुरा, नेहरूनगर, लक्ष्मीनगर आणि हनुमान नगर झोनमधील खड्डे बुजविण्याबाबत कार्य केले जाणार आहे.

झोननिहाय समन्वयक

हॉट मिक्स प्लाँट विभागाद्वारे झोननिहाय समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. लक्ष्मीनगर झोनकरिता उपअभियंता नेताम, धरमपेठ झोनकरिता उपअभियंता मोकडे, हनुमाननगर झोनकरिता उपअभियंता आगरकर, धंतोली झोनकरिता प्र- उपअभियंता तालेवार, नेहरूनगर झोनकरिता उपअभियंता निखार, गांधीबाग झोनकरिता उपअभियंता कोटांगळे, सतरांजीपुरा झोनकरिता उपअभियंता बोबडे, लकडगंज झोनकरिता उपअभियंता भोवते, आशीनगर झोनकरिता उपअभियंता गजभिये, मंगळवारी झोनकरिता उपअभियंता सोनकुसरे यांनी नेमणूक करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यावर बजेटमध्ये अन्याय केल्याने भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गांधी चौकात केला निषेध आंदोलन

Thu Jul 25 , 2024
भंडारा :- केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याला अर्थ संल्पात निधी न देऊन महाराष्ट्र राज्यावर वर मोठा अन्याय केला असून या राज्य सरकार द्वेषाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या वतीने केंद्र सरकार चे भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक येथे निषेध करण्यात आला. यात शहराध्यक्ष मधुकर चौधरी, मधुकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!