नागपूर :- नवीन सुभेदार येथील एडुसन फाऊंडेशन येथे १२ मे रोजी करिअर मार्गदर्शनावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राचा हेतू विद्यार्थ्यांना त्यांचा व्यावसायिक प्रगतिकरता, निवडलेल्या शिक्षणासोबत विविध कौशल्य पूर्ण उपक्रमाकरीता मानसिक कल तयार करणे हा होता. चर्चासत्रास अतिथी वक्ते एस बी जैन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. डी. बी. राणा, संस्थेचे संचालक निलेश काळे व सदस्य उमेश ठाकरे उपस्थित होते.
डॉ. राणा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व करिअर यशस्वी होण्यासाठी कौशल्यपूर्ण मानसिकता किती महत्त्वाची आहे यावर त्यांनी संबोधित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विकासासाठी आवश्यक असलेले जीवन कौशल्य आत्मसात करण्यास प्रवृत्त केले.
एडुसन फाउंडेशनचे संचालक यांनी विद्यार्थ्याना त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील अडथड्यावर मात करण्यासाठी प्रोत्साहित केले व संस्थेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध विद्यार्थ्यांचा विकासाशी संबंधित उपक्रमाची माहिती दिली व संबोधित केले. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोज काळे यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.