नागपुर :- आम आदमी पक्ष महाराष्ट्र चे नवनियुक्त प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील विदर्भाच्या संगठन विस्तार बूथ पर्यंत करण्यासाठी दौऱ्यावर आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात संपूर्ण ताकदीणीशी आम आदमी पार्टी लढणार या तयारी साठी त्यांची नागपूर येथे आढावा बैठक घेतली आहे.
आम आदमी पार्टी ने देशभरात नवीन आशा आणि अपेक्षांची लाट निर्माण केली. महाराष्ट्रात अनेक पक्ष आणि अनेक नेते आहेत पण महाराष्ट्रातील जनतेसाठी कोणीही काम करत नसल्याचा दावा अजित फाटके पाटील यांनी केला आहे.
” दिल्ली पंजाब प्रमाणे महाराष्ट्र सुद्धा आम आदमी पार्टीचा विस्तार लोकशाही मूल्यांची जोपासना आणि जनसामान्यांचे शिक्षण, आरोग्य, बेरोजगार, शेतकरी, मजूर, कष्टकरी यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सामान्य नागरिक मोठ्या उत्साहात या राजनीतिक क्रांतीसाठी जुडत आहे. अनेक जागृक नागरिक ज्यांना या राजनीतिक क्रांतीच्या चळवळीमध्ये सामील व्हायचे आहे त्यांनी सामील व्हावे त्यांनी महाराष्ट्राला खऱ्या दृष्टीने व्यापक स्वरूपात लोकशाही प्रधान महाराष्ट्र बनवून आम आदमी पक्षाचे कार्य करावे. ” असे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष अजितदादा फाटके पाटील यांनी पत्रपरिषदेत आवाहन केले.
“भारत भर निवडून दिलेले लोकप्रतिनिधी दोन राज्यांमध्ये सरकार अनेक राज्यांमध्ये आमदार असलेल्या लोकशाही प्रधान लोकाभिमुख आम आदमी पार्टी मध्ये शहरातील तमाम नागरिकांना ज्यांना लोकशाही प्रमाणे कार्य करणाऱ्या राजनीतिक क्रांती घडवणाऱ्या आम आदमी पार्टी पक्षात सहभाग घ्यायचा असेल त्यांनी पक्षाच्या शहराच्या व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.”असे प्रतिपादन विदर्भ संघटन मंत्री भूषण ढाकूळकर यांनी केले यांनी केले.
“महाराष्ट्रातील जनता देवावर अवलंबून आणि असहाय्य आहेत.गुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधी मार्फत लोकांचे प्रश्न सुटत नसून त्यांना बदलवण्याची वेळ आली आहे . लोकांकडे आता आपच्या रूपाने एक पर्याय आहे.त्यामुळे लोकांची आता पहिली पसंती आम आदमी पार्टी बनत असून नागपूर जिल्ह्यातील लोकांनी पक्षाशी संपर्क करावा व मोठ्या संख्येने सामील व्हावं.” असे शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे यांनी म्हटले
आम आदमी पक्षाच्या बैठकीला जिल्ह्यातील पक्षाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.