खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र उभारणीचा प्रस्ताव सादर करावा – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

मुंबई :- कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर जि. सांगली येथे उभारण्यासाठी विद्यापीठ कार्यकारी समितीचा अहवाल सकारात्मक आहे. तसेच शासकीय जागाही उपलब्ध आहे. खानापूर येथे विद्यापीठाच्या उपकेंद्र उभारणीमुळे सातारा, सांगली या भागातील विद्यार्थ्यांची सोय होणार असून उपकेंद्राचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित उपकेंद्र आढावा बैठकीत मंत्री देसाई बोलत होते. बैठकीस उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सुहास बाबर आदी उपस्थित होते. तर दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू दिगंबर शिर्के, कुलसचिव व्ही. एन शिंदे, प्राचार्य व्ही. एम पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.

विद्यापीठाने खानापूर येथील उपकेंद्राचा सर्वसमावेशक प्रस्ताव पाठविण्याचे सांगत मंत्री देसाई म्हणाले, खानापूर येथे शासकीय गायरान जमिन उपलब्ध आहे. तसेच जलसंपदा विभागाची जमीनही आहे. आवश्यकता असल्यास जलसंपदा विभागाच्या जमिनीचाही उपयोग करता येईल. सांगली येथे तात्पुरते उपकेंद्र सुरू न करता खानापूर येथेच कायमस्वरूपी उपकेंद्र सुरू करावे. प्रस्ताव तातडीने सादर करून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता घेण्यात येईल. तसेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीसुद्धा चर्चा करण्यात येईल, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कृषी निविष्ठा सुधारणा विधेयक सर्वसामान्य शेतकरी व प्रामाणिक निविष्ठा विक्रेत्यांना जाचक नाही - कृषीमंत्री धनंजय मुंडे

Thu Feb 22 , 2024
मुंबई :- कृषी निविष्ठा सुधारणा विधेयकाबाबत 2000 पेक्षा जास्त हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. हे सुधारणा विधेयक शेतकरी तसेच प्रामाणिक कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी जाचक असणार नाही, असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. अप्रमाणित, भेसळयुक्त व बनावट बियाणे, कीटकनाशके पासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित कायद्याच्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी नियुक्त संयुक्त समितीची तिसरी बैठक आज मंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com