नागपूर – भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंती निमित्याने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत ओबीसी आयोगाचे माजी सदस्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारणीचे सदस्य दीपक काटोल तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस ॲड. नंदाताई पराते होत्या. भारतरत्न राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले.
भारताचा इतिहासात सर्वात तरुण प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांची ओळख आहे. त्यांनी वयाच्या ४० व्या वर्षी देशाची सूत्रे हाती घेतली. त्यांना एक दूरदर्शी नेता म्हणून मानल्या जाते. आपल्या अल्प कारकिर्दीतही त्यांनी देशात आमूलाग्र बदल केले. ज्या निर्णयामुळे राजीव गांधी अजरामर झालेत. आणि त्यांच्या निर्णयामुळे देशातील ग्रामीण भागात प्रगतीला गती मिळाली . १८ व्यावर्षी मतदानाचा हक्क ,पंचायत राज व्यवस्था बळकट करणे, देशात संगणकाची सुरुवात , डिजिटल क्रांती चा पाय रोवला. मोफत शिक्षण ,रोजगार संधी इत्यादी महत्वाचे निर्णय हे भारताला प्रगतीवर नेण्यासाठी केले असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारणीचे कोर सदस्य दीपक काटोल यांनी केले.
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंती निमित्याने भारताच्या ओबीसी आयोगाचे माजी सदस्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारणीचे सदस्य दीपक काटोल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस ॲड. नंदाताई पराते , जयंत दळवी,काँग्रेस अल्पसंख्याक सेल समन्वयक महेंद्र वोरा ,अनिल आदमने, अंदाज वाघमारे,अलोक कोंडापूलवर,मुकेश गजभिये ,अजय हाटेवर ,पवन गजभिये ,संदेश झाडे,पाशु खान बाळू सातपुते ,राजेश राहाटे ,सुनील महाजन,पियुष गायकवाड ,रैनाक चौधरी,ईश्वर ढोले,मनोज अहिर,प्रा. रमेश भुसारी,नीलकांत ढोके ,मामा राऊत ,मंदा शेंडे,माया धार्मिक ,शकुंतला वट्टीघरे यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.