नागपूर :-महानिर्मितीच्या नाशिक आणि भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे महानदी कोलफील्डच्या तालचेर खाणींमधून रेल्वे समुद्र रेल्वे (Rail Sea Rail RSR) मार्गे कोळसा आणण्यात येणार आहे. तसे 50 करोड चे दोन कार्यादेश महानिर्मितीच्या मुख्य कार्यालयातील मुख्य अभियंता (इंधन व्यवस्थापन) राजेश पाटील यांनी जारी केले आहेत. राजेश पाटील यांच्याकडे सध्या मुख्य अभियंता (इंधन व्यवस्थापन) यासोबतच संचालक (खनिकर्म), कार्यकारी संचालक (कोळसा) या कोळशासंबंधित सर्वोच्च पदांचे पदभार देऊन व्यवस्थापनाने कृपा केली आहे.
RSR मार्गाद्वारे कोळसा आणल्यामुळे 3125 रु प्रति टन एवढा जादाचा आर्थिक बोजा विनाकारण महानिर्मितीवर पडणार आहे आणि हा जादाचा बोजा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांकडूनच वसूल करण्यात येणार आहे.
आधीच ५०%पर्यंत महाग झालेली वीज आता अजून महागणार यात काही शंकाच नाही.
महानिर्मितीचा जवळपास 15लक्ष मेट्रिक टन कोळसा कोल वॉशरी मध्ये अडकून आहे, आणि संपूर्ण महानिर्मितीच्या विज केंद्रांमध्ये आज जवळपास 14लाख मेट्रिक टन एवढाच कोळसा साठा उपलब्ध आहे. भुसावळ, पारस, परळी, नासिक या वीज केंद्रातील साठा अत्यंत कमी आहे आणि चंद्रपूर, कोराडी येथील कोळसा साठा रोज झपाट्याने कमी होत आहे. एकीकडे वॉशरी मध्ये कोळसा साठा अडकवून ठेवायचा आणि कृत्रिम कोळसा टंचाई भासवायची आणि दुसरीकडे हे कारण पुढे करून अशा प्रकारचे RSR (Rail Sea Rail), RCR(Road cum Rail) आर्थिक भुर्दंड देणारे कार्यादेश काढायचे हे महानिर्मितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नेहमीचे अलिखित धोरण ठरलेले आहे.
येत्या जून-२३ आणि जुलै-२३ महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात सागरी मार्गाने कोळसा आणण्याची योजना करण्यात आली आहे.
हा कोळसा ऐन पावसाळ्यात सागरीमार्गाने आणल्यामुळे या कोळशातील आर्द्रता ही कित्तेक पटींनी वाढणार आहे आणि ओला मातीमिश्रित चिखलयुक्त कोळसा महानिर्मितीच्या विजकेंद्रांना मिळणार यात काहीच शंका नाही, त्यामुळे अशा प्रकारे कोळसा आणण्याचा घाट हा केवळ या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खिसे भरण्याकरिताच घातला जात आहे.LOA_RSR_NTPS_16052023
सदर RSR, RCR कार्यादेश, टेंडर कागदपत्रे सोबत जोडली आहेत.RSR_Bid Specification_Final