अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या पदवी/ पदव्युत्तर पदवी, समुपदेशन व मानसोपचार अभ्यासक्रमाव्दारा ‘एकविसाव्या शतकातील समुपदेशाची कौशल्ये’ या विषयावर उद्या शनिवार दि. 24 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता डॉ. के.जी. देशमुख सभागृह येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
समुपदेशन कौशल्ये ही परस्पर आणि तांत्रिक वैशिष्ट आहेत, जी समुपदेशक त्यांच्या सल्लार्थीला चांगल्या प्रकारे समजून व ऐेकण्यासाठी वापरतात. या कौशल्यांचा वापर करून समुपदेशक समस्याग्रस्त व्यक्तीला आनंदी जीवन जगण्यापासून रोखणा-या अडथळ्यांवर मात करण्यास मदत करतो. या पार्श्वभूमीवर भावी मानसशास्त्र व समुपदेशकांच्या कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक कीर्तीचे समुपदेशक डॉ. संजय रहाटे (मुंबई) हे समुपदेशन विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थी, मानसशास्त्रज्ञ, समुपदेक्षक तसेच प्राध्यापक, कर्मचारी, वयोवृध्द नागरिकांंनी उपस्थित राहुन या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.