बाजाराचे अनेक आधुनिक पर्याय आले मात्र त्यातही कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षमपणे उभी आहे. – आमदार सुनीलबाबू केदार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक आमसभा संपन्न

कामठी :- कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून समाजातील एक मोठा घटक या बाजार समितीवर अवलंबून आहे.अनेकांचे पोट या बाजार समितीवर आहे. त्यामुळे कोणताही व्यापार आला तरी बाजार समिती टिकेल हे निश्चित .ऊन वारा पाऊस या संकटांना न जुमानता बाजार समिती आपले काम करत आहे.त्यासाठी शेकडो व्यापारी,कामगार, बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी राबत असतात .कोरोना महामारीच्या काळातही बाजार समिती अविरतपणे सुरू होती अनेकांनी प्राणाची बाजू लावून काम केले त्यामुळेच बाजार समिती आज सक्षमपणे उभी आहे.बाजाराचे अनेक आधुनिक पर्याय आले.मात्र त्यातही बाजार समिती सक्षमपणे उभी आहे.असे मौलिक प्रतिपादन माजी मंत्री व आमदार सुनीलबाबू केदार यांनी कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक आमसभेत व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती कामठीची सन 2021 22 ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतेच 24 डिसेंबर ला समितीचे सभापती अनिकेत शहाणे व उपसभापती कुणाल इटकेलवार यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. या प्रसंगी माजी मंत्री आमदार सुनीलबाबू केदार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर,कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हुकूमचंद आमधरे आदी प्रामुख्याने हजर होते. वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू करण्यापूर्वी सहकार महर्षी स्वर्गीय बाबासाहेब केदार यांचे पूर्णकृती तैलचित्रास माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून सभेस सुरुवात करण्यात आली. समितीची वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर आमदार सुनीलबाबू केदार, माजी जी प।अध्यक्ष सुरेश भोयर ,समितीचे उपसभापति कुणाल इटकेलवार व इतर मान्यवर यांचे हस्ते कामठी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरात माजी जि.प. सभापती पुरुषोत्तम शहाणे, कृ उ बा स कामठी चे संचालक हुकुमचंद आमधरे, जिल्हा परिषद सदस्य प्रा अवंतिका लेकुरवाडे,अनुराग भोयर, जी प सदस्य दिनेश ढोले, कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे, सदस्य सोनूताई कुथे, सरपंच सरिता रंगारी, कृ उ बा स कामठी चे संचालक सुधिर शहाणे, कृष्णा करडभाजने, सुर्यभान करडभाजाने, भाऊराव गौरकर, प्रभाकर हुड, लंकाबाई वाघ, लताबाई आकरे, रमेश गोमकर, रामकृष्ण प्रगट, नवलकिशोर डडमल, सचेलाल घोड़मारे, नानकराम झमतानी, किशोर धांडे, कमलाकर मोहोड, नाना मंडलिक, विजय खोडके, इश्वर तायवाडे, निखिल फलके, कुनाल शिंगने, मोतीराम इंगोले, रुपेश शेंदरे, शामराव अढोळे, नामदेव इंगोले, अमृत पांडे आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन समितीचे संचालक नवलकिशोर डडमल यांनी केले व आभार प्रदर्शन संचालक सूर्यभान करडभाजने यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तसेच सदस्य व व्यापारी प्रतिनिधी व बहुसंख्य शेतकरी बंधू हजर होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत उपसरपंच पदाचा मुहूर्त निघाला..

Wed Dec 28 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – 6 जानेवारीला होणार उपसरपंच पदाची निवड – सरपंचाच्या अधिकच्या मताला आले.. महत्व,उपसरपंचपदासाठी अर्थपूर्ण हालचाली.. कामठी ता प्र 28 :- 18 डिसेंबर ला पार पडलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत 27 सरपंच व 93 प्रभागातील 247 सदस्त निवडून आले असून थेट जनतेतून 27सरपंच निवडून आले असले तरी निवडुन आलेल्या सदस्यमधून उपसरपंच पदाची निवड होणार आहे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights