BRSP द्वारा नागपूर महानगरपालिका आयुक्तांना स्मरण पत्राद्वारे निवेदन.
नागपूर :- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी नागपूर जिल्हा द्वारा 30 सप्टेंबर रोजी , संविधान चौकात नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील ज्वलंत समस्यांविरोधात धरणे-प्रदर्शन आंदोलन करण्यात आले होते. त्याच दिवशी बीआरएसपी शिष्टमंडळाने नागपूर महानगरपालिका आयुक्तांना 12 मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते त्यात प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक, अंबाझरी बगीच्याशेजारी असलेल्या ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह पुन्हा बांधण्यात यावे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. (नागपूर हायकोर्टात आता हा विषय गेला) महानगरपालिका बरखास्त असूनही नगरसेवकांच्या नावाच्या पाट्या प्रभागात लागलेल्या आहेत, त्या त्वरित काढून टाकाव्यात, रस्त्यालगत असलेल्या खुल्या भुखंडावरील व बाजारातील कच-याची रोज उचल व्हावी, महानगरपालिकेतील ऐवजदारांना कायम नोकरीत सामावून घ्यावे. इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. एक महिना उलटला तरी मनपा प्रशासनाने याची दखल घेतली नाही म्हणून आज बी आर एस पी जिल्हाध्यक्ष डॉ. विनोद रंगारी, दक्षिण नागपूर अध्यक्ष दिलीप पाझारे, पश्चिम नागपूर बीआरएसपी अध्यक्ष कमल किशोर यांच्या शिष्टमंडळाने स्मरण पत्राद्वारे पुन्हा निवेदन दिले. आठवडाभरात याकडे लक्ष दिले नाही तर त्यानंतर बी आर एस पी द्वारा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.