नागपूर :-आज ६ डिसेंबर परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला बाल कल्याण समिती जि.प. नागपुर यांच्या नेतृत्वात होणारी बाईक रॅली आचारसंहिता मुळे आणि अनेक गावात ग्रामपंचायत चे इलेक्शन असल्यामुळे परवानगी न-मिळाल्याने रॅली रद्द करण्यात आलेली होती.
परंतु वैयक्तिक रित्या प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे यांनी वडोदा – बिडगाव जि.प. सर्कल मधील बिडगाव, तरोडी (बु), खेडी, परसोडी, टेमसना, आडका, केम, शिवणी, निंबा, चिखली, झरप, वरंभा, नान्हा मांगली, रान मांगली, जाखेगाव, बोरगाव, भामेवाडा, आसलवाडा, वडोदा, भुगाव ई.
सर्व बौद्ध विहारांमध्ये जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रसंगी दिलीप वंजारी उपसभापती पं.स. कामठी, आशिष मल्लेवार माजी उपसभापती पं.स. कामठी, जयश्री मेश्राम, सीमा जामगडे, रमेश लेकुरवाळे, फकिरा फुलझेले, अनिल झोडगे, राजू बागडे, नितेश सातनुरकर, आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.