– पंतप्रधान स्थितीची समीक्षा करण्यासाठी ओडिशाच्या दौऱ्यावर
मुंबई :- ओडिशा राज्यात झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेनंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी स्वतः ओडिशाच्या दौऱ्यावर निघाले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ओडिशातील भयानक रेल्वे दुर्घटनेनंतर झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक झाली. अपघातग्रस्तांचे बचावकार्य, मदत आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याशी संबंधित सर्व पैलूंवर आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओडिशा भेटीसाठी निघाले असून रेल्वे अपघातांनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करणार आहेत.