नागपूर :- 16 डिसेंबर रोजी शिवसेना मुख्यनेते, जनतेच्या मनातील लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, विदर्भ महिला संपर्कप्रमुख नामदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनात, नागपूर जिल्हा प्रमुख मनीषा पापडकर यांच्या पुढाकाराने पूर्व विदर्भातील महिला पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पूर्व विदर्भातील महिला जिल्हाप्रमुख यांचा संवाद मेळावा प्रेस क्लब, सिविल लाईन, नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात काळात संपन्न झाला.
या कार्यक्रमामध्ये शिवसेना सचिव व प्रवक्त्या आणि विधानपरिषदेच्या मुख्य प्रतोद नामदार डॉ.मनीषा कायंदे यांनी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य आनंद दिघे यांना अभिप्रेत 80 % समाजकारण व 20% राजकारण यां तत्वानुसार काम करत विदर्भात शिवसेना महिला आघाडी बळकट करण्याकरता, तळागाळातील महिलांपर्यंत शिवसेने पर्यंत शासकीय लाभ पोचवण्याकरीता मार्गदर्शन केले.
आपल्या भागातील जास्तीत जास्त महिलांना सक्षम करा. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लोकहितासाठी सुरु केलेल्या लेक लाडकी योजने सारख्या अभूतपूर्व संकल्पनेतून महाराष्ट्रातील 37 लाख महिलांना प्रत्यक्ष लाभ झाला. सदर योजनेद्वारा मिळालेल्या आर्थिक मदतीतून अनेक महिलांनी रोजगार सुद्धा सुरू केले. याच काळातील अन्नपूर्णा योजना, वयश्री योजना, तीर्थदर्शन योजना, जनतेला शासकीय कार्यालयात कागदपत्रासाठी माराव्या लागणाऱ्या येरझरा थांबाव्या याकरिता शासन आपल्या दारी कार्यक्रम प्रत्येक शहरात तालुक्यात राबविण्यात आले, राज्य शासनाने गो-मातेला राजमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला, महिलांना एसटी बस प्रवासात 50% सवलत दिली. अशा अनेक कल्याणकारी योजना कायम जनतेला समर्पित असलेल्या एकनाथजी शिंदे आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात राबवल्या आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अनेक रुग्णांना थेट लाभ देण्यात आला, अनेक अपघात ग्रस्त रुग्णांना मोफत आरोग्य सेवा व आर्थिक मदत करण्यात आली. जनतेसाठी जे शक्य होईल ते सर्व एकनाथ शिंदे यांनी केले असून आपण सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या योजना तसेच त्यांचे हिंदुत्ववादी विचार तळागाळात पोहोचवावे व विदर्भात शिवसेना अधिक भक्कम करावी याबाबत मार्गदर्शन केले.
कायंदे यांनी आपल्या भाषणात “गाव तिथं शाखा व घर तिथे झेंडा” या तत्वानुसार प्रत्येक शहरात, गावात, प्रभागात पक्ष बांधणी करत नवीन मतदार नोंदणी करावी, सर्वसामान्य जनतेच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करावा असे प्रतिपादन करत उपस्थित सर्व जिल्हाप्रमुख व महिला पदाधिकारी यांना संबोधित केले. या कार्यक्रमात डॉ. कायंदे यांच्या शुभहस्ते शुभांगी ठमेकर यांची वर्धा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी पूर्व विदर्भातील महिला जिल्हाप्रमुखांनी आपापल्या क्षेत्रातील महिलांच्या समस्या मांडल्या. वर्धा येथील जिल्हाप्रमुख गणेशभाऊ इखार यांनी सुद्धा उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मनीषा कायंदे यांच्या हस्ते पूर्व नागपूर येथील अनेक महिलांचा शिवसेना पक्षप्रवेश घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन मालती अमृतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक व नागपूर जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रतिमा ठाकूर यांनी केले. या कार्यक्रमाला वर्धा येथील जिल्हाप्रमुख गणेश इखार, अनिता जाधव, सविता तुरकर, माया शिवणकर, शारदा सोनकनवरे, शुभांगी ठमेकर, नेहा भोकरे, उपजिल्हा संघटिका मनिषा पराड, मंजुषा पानबुडे, गायत्री वैद्य, शहर प्रमुख पूनम चागडे, वाणी सदालावार, माया मेश्राम, सुनिता गोवर्धन, कीर्ती सोमवंशी, रूपाली माकोडे, रत्नमाला वैद्य, सुनिता पांढरे अनिता पारधी, मोना शेंडे, शोभा मसराम, जयश्री कापसे, प्रतिमा वायफडे, शहर संघटिका नीलिमा शास्त्री, विभाग संघटिका उज्वला उंमरे, बबीता चालखोरे, वृषाली बाईवार, सुनीता चालखोरे, पुनम हरोडे, यांच्यासह अनेक महिला शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.