अरोली :- कोदामेंढी येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उद्या 26 जानेवारी रविवारला सकाळी 11 वाजता गणराज्य दिनी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच आशिष बावनकुळे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा दिक्षिका मोती कौशिक ,प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख ,माजी पंचायत समिती सदस्य दीपक गेडाम अनिल बुराडे, माजी सरपंच भगवान बावनकुळे ,उपसरपंच गोपाल गिरमेकर, ग्रामपंचायत तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विष्णू बावनकुळे, ग्रामपंचायत सदस्य गण खुशाल शिवणकर, सदानंद मेश्राम, रवी ठवकर, अंजली अमोल मोहर्ले स्वाती संदीप गोरखेडे ,रूपाली अनिल ठाकरे, अनिता नामदेव हटवार ,कोमल पंकज खडसे, हेमलता किशोर देवतळे सह गावातील परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पुढारी पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान मुख्याध्यापक चंद्रशेखर शिवणकर ,आयोजक शाळा व्यवस्थापन समिती ,संपूर्ण सदस्यगण ,समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद ,जिल्हा परिषद विद्यालय कोदामेंढी ने केले आहे.