नागपूर :- बांधकाम व्यवसायिक रमेश आसुदानी वय ६९ वर्षे रा. जरीपटका यांची टीव्ही टावरजवळील व्हिटरनरी कॉलेच्या पाठीमागे निर्माण ग्रेस नावाने कस्ट्रक्शन साईड असुन त्या साईडमधील दोन्ही बिल्डींगचे बांधकाम कायदेशीर आहे. परंतु आरोपी महीला वकील नसरीन हैदरी रा. कामठी व तिचा साथीदार संजय शर्मा यांनी सदर साईटवर जावून साईटचे फोटो काढून तेथून तक्रारदार यांचा मुलगा यांचा मोबाईल नंबर प्राप्त करून संजय शर्मा याने त्यांना तुमची कस्ट्रक्शन साईडचे बांधकाम बेकायदेशीर आहे. त्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील नसरीन हैदरी यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली असुन तुमचे कागदपत्रे अपूर्ण असून कागदपत्रे घेवून ऑफीसला या. असे म्हणाले त्यानंतर वकील नसरीन हैदरी यांनी तक्रारदार यांना फोन करून तुमच्या दोन्ही बिल्डींगबददल तकार प्राप्त झालेली आहे. ती बंद करायची किंवा कागदपत्रे दाखवायची नसेल तर मी माझा माणूस संजय शर्माला आपल्याकडे पाठवते तुम्ही त्यांच्याशी बोला असे म्हणून संजय शर्माला तक्रारदार यांचे जरीपटका येथील आफीसमध्ये पाठवले. ते आफीसमध्ये जावून तुमची तक्रार बंद करायची असेल तर नसरीन यांना ५ लाख दयावे लागेल असे म्हणून निघून गेले. त्यानंतर त्यांनी तक्रारदार यांना वारंवार फोन करून खंडणीची मागणी केली. दिनांक २६.०५.२०२३ रोजी नसरीन हैदरी व संजय शर्मा यांनी तक्रारदार यांना सदरमधील उडुप्पी हॉटेलमध्ये बोलावले. तेथे नसरीन यांनी केस बंद करण्यासाठी ५ लाख रूपये दयावे लागतील असे म्हणाल्या तक्रारदार यांनी सर्व संभाषणाची रेकॉर्डींग केली. तेव्हा तकारदार यांनी त्यांना मी माझे पाटर्नरशी चर्चा करून सांगतो असे म्हणाले त्यानंतरही आरोपी वकील नसरीन हैदरी व संजय शर्मा यांनी तक्रारदार यांना वारंवार फोन करून पैशाची मागणी केली. त्याचे कॉल रेकॉर्डींग तक्रारदार यांनी ठेवले. तक्रारदार यांची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पोलीस उप आयुक्त डिटेक्शलन सुदर्शन यांची प्रत्यक्ष भेट घेवून तक्रार दिली. त्याप्रमाणे खंडणी विरोधी पथकाने त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळून आल्याने सापळा कारवाई करण्याचे ठरले आज रोजी संजय शर्मा यांनी तक्रारदार यांना फोन करून आज नसरीन यांच्या जैस्वाल होटल साईंडला व्हिझिट आहे तुम्ही पैसे घेवून जैस्वाल हॉटेलला या असे सांगितले. त्याप्रमाणे सापळा रचून आरोपी नसरीन हैदरी व संजय शर्मा यांनी पंचासमक्ष एक लाख रूपये रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर यशोधरानगर पोलीस ठाणे येथे खंडणीचा गुन्हा नोंद केला आहे.
सदर सापळा कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उप आयुक्त डिटेक्शन सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोनि सारीन दुर्गे, सपोनि ईश्वर जगदाळे, सपोनि माधुरी नेरकर, नापोशी चेतन जाधव, पोशि सुधीर सोंदरकर, नितीन वासने, संतोष चौधरी, अनिल बोटरे महिला अंमलदार रिना जठरकर, पुनम शेंडे यांनी केली आहे