नागपूर :- फिर्यादी राजेश राजन चाक्कल वय ५८ वर्ष, रा. प्लाट नं. ३०२ संताजी सोसायटी, बेलतरोडी, नागपुर, हे मागील तिन वर्षांपासून नायर कंपनी येथे सर्विस डिपार्टमेंट मध्ये काम करतात. कंपनीचे बैंक अकाउंट पंजाब नॅशनल बैंक, किंग्जवे सदर येथे आहे. फिर्यादी हे दिनांक ३०.०६.२०२३ चे १२.१५ वा. चे सुमारास कंपनीचे पैसे काढण्या करीता बँकेत आले व त्यांनी दोन लाख रूपये काढून स्वतः जवळील बॅग मध्ये ठेवले. फिर्यादी यांचे मागे उभे असलेली अनोळखी महिलेने ब्लेडने फिर्यादी जवळील बॅगेला चिरा मारला व त्यातील दोन लाख रूपये काढण्याचा प्रयत्न करीत असतांना तेथील एका इसमास व कर्मचारी यांना दिसल्याने त्यांनी नमुद महिलेस बँकेतिल ईतर महिलांचे मदतीने ताब्यात घेतले. सदर पोलीसांनी त्वरीत बँकेत येवून महिलेला ताब्यात घेतले. तिचे नाव विचारले असता तिने तीचे नाव पिंकी विजय सिसोदिया वय २० वर्ष रा. गाव करीया, काली माता मंदीर जवळ, राजगढ़, मध्य प्रदेश असे सांगीतले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे सदर येथे पोउपनि कुल्लेवार यांनी महिला आरोपीविरुध्द कलम ३७९, ५११ भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.