चंद्रपूर :- चंद्रपूर व लगतच्या कित्येक गावाची जिवनदायीनी असलेली इरई नदी पात्रात गाळ साचल्याने मृतावस्ते व लुप्त होण्याकडे वाटचाल करीत आहे.आम्ही भाग्यवान आहो कारण महाराष्ट्र व देशातील कित्येक गाव व शहराला 300 फुटाहून जास्त वर्धा,पैनगंगा,वैनगंगा इतिकी रुंद इरई नदी निसर्गाने देऊन ही मृतप्राय होण्यापासून वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले नाही निव्वळ पात्रातील झाडं- झूडप साफ करुन नदीच खोलीकरण केल्याचं आव आजपर्यंत करण्यात आला आहे तोच कित्ता गिरवीत यावर्षीच्या पावसाळ्याच्या अगदी तोंडावर 23 मे पासून सुरवात करुन व प्रसिद्धी देऊन प्रशासन व लोकप्रतिनिधी आपली पाट थोपटवून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. यासारख्या खोटारड्या व जनतेला मूर्ख बनविण्याच्या नादा मुळे सन 1986,2006,2013 व आता प्रत्येक वर्षी 2022, 2023 रोजी महापुराचा मोठा फटका जनतेला वारंवार सोसावा लागला.मोठी वित्त होनी सोबतच, बेघरा सारखं जिवन कित्येक दिवस जनतेला जगावं लागलं.प्रत्येक वर्षी येणाऱ्या महापुराचे दुःखद अनुभव भोगलेल्या जनतेला पूर येण्यापूर्वी घरे सोडून सुरक्षित अथवा नातेवाईकांचे आश्रयास गेल्याने मोठी जीवित हानी होण्यापासून टळली.
इरई बचाव जनआंदोलन सन 2006 पासून दाताळा पूल ते हडस्ती या दाट लोकवस्ती व मोठया प्रमाणात बाधित होणाऱ्या इरई पट्ट्याचे खोलीकरण करण्याची मागणी निवेदन,पदयात्रा, बैठा- जल सत्याग्रह करीत सातत्यांने मागिल 18 वर्षांपासून करत आहे परंतु लोकप्रतिनिधी-प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे व खोलीकरण टाळत फक्त पात्रातील झाडे काढून खोलीकरण करीत असल्याचे चित्र बातम्याच्या रूपात रंगविण्याचा केविलवाणा व जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न प्रशासन व लोकप्रतिनिधी करीत असल्याचा आरोप इरई बचाव जनआंदोलनाचे जनक व वृक्षाई चे संस्थापक कुशाब कायरकर यांनी केला आहे.
पात्रातील झाडझूडपे साफ केल्याने पात्रातील माती सैल झाली इरई धरणाचे 7 दरवाजे जेव्हा उघडेल तेव्हा खरडून पात्रातील माती पाण्याच्या मोठया व वेगवान प्रवाहने माना टेकडी जवळील इरई पात्रातील ” s” आकाराच्या वळणावर साचून बॅक वॉटर च्या रूपाने महापुरात परावर्तित होऊन यावर्षीही सन 2006 व 2013 सारखा ढगफुटी व महापुराचा फटका जनतेला सहन करावा लागणार आहे त्याकरिता जनतेने स्वतः सावध राहण्याचा सल्ला कायरकरांनी दिला आहे.चंद्रपूरचे पालकमंत्री,आमदार व प्रशासनाने फक्त पात्रातील झाडं -झूडप,साफसफाई केल्याने महापूर येणार नाही, लोकांची घरे पाण्याखाली जाणार नाही याची ग्यारंटी देण्याची,गाळाने पूर्ण बुजल्या मुळे विहीर- बोरिंग आटून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई व पावसाळ्यात पुरास कारणीभूत ठरणाऱ्या पात्राचे खोलीकारण पावसाळ्या नंतर म्हणजे ऑक्टोबर 2024 पासून पुन्हा सुरु करणार असल्याची ग्यारंटी जनतेला देण्याची व या साफसफाई निमित्ताने जनतेच्या किती पैसा खर्च होणार याची प्रामाणिक सार्वजनिक माहिती देण्याची मागणी कायरकर यांनी केली आहे. चंद्रपूरचे लोकप्रतिनिधींनी जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाच्या मनसुब्यांना हाणून पाडावे अन्यथा झालेल्या लोकसभे प्रमाणे येत्या विधानसभा/मनपा निवडणुकीत दुःख भोगत असलेले चंद्रपूरकर लोकप्रतिनिधींना व त्यांच्या राजकीय पक्षांना इंगा दाखविण्यासाठी वचनबद्ध आहे.