संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-3 मे ते 2 जून पर्यंत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाचा लाभ घ्यावा-तहसीलदार अक्षय पोयाम
-आजणीत 3 मे ला दोन दिवसीय ‘शासकीय योजनांची जत्रा’ उपक्रमाचे आयोजन
कामठी :- राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे.शासकीय योजनापासून कुणीही वंचीत राहू नये याचा विचार करून शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून हा उपक्रम कामठी तालुक्यात 3 मे पासून 2 जून पर्यंत राबविण्यात येणार आहे.त्यानुसार कामठी तालुक्यात 3 मे पासून पूर्ण एक महिना शासकीय योजनांची जत्रा भरणार आहे तेव्हा या उपक्रमाचा जास्तीत जास्त गरजुनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले आहे.
मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान करण्यासाठी महाराजस्व अभियान योजनांची जत्रा 2023 याबाबत प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कामठी तालुकास्तरावर तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणार आहे कामठी तालुक्यात 3 व 4 मे रोजी हे अभियान आजनी येथील सेंट जेनेली स्कुल परिसरात घेऊन जत्रेचा शुभारंभ होणार आहे तर महिनाभर राबविलेल्या या उपक्रमाचा 2 जून ला कोराडी मंडळात अभियान राबवून या उपक्रमाचा समापन करण्यात येणार आहे .
शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाच्या जाहीर कार्यक्रमानुसार कामठी तालुक्यातील कामठी मंडळात 3 व 4 मे रोजी आजनी येथील सेंट जेनेली सभागृहात सदर अभियान राबविण्यात येणार आहे .यामध्ये कामठी,खैरी,भिलगाव ,खसाळा, येरखेडा,रणाळा ,घोरपड,आजनी,गादा,सोनेगाव राजा,उनगाव, नेरी गावातील लाभार्थी या उपक्रमाचा लाभ घेतील. वडोदा मंडळात 11 व 12 मे ला भूगाव येथील स्नेही विकास विद्यालय येथे उपक्रम राबविण्यात येणार असून या अभियानात बोरगाव,नान्हा,रांनमांगली,केसोरी, भामेवाडा, आसलवाडा, जाखेगाव, भुगाव, मांगली, वरंभा,झरप,निन्हाई रिठी, नेरला ,शिवणी,निंबा,चिखली, सेलू चे लाभार्थी सहभाही राहतील.18 व 19 मे ला महालगाव मंडळातील कढोली ग्रामपंचायत येथे अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये महालगाव,कढोली,पावंनगाव,शिरपूर, धारगाव, दिघोरी,गारला, सावळी, गुमथळा, एकर्डी,आवंढी,लिहिगाव,भोवरी चे लाभार्थी लाभ घेतील.25व 26 मे ला तरोडी बु मंडळा त 25 व 26 मे ला ग्रा प तरोडी बु येथे अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये तरोडी बु,तरोडी खु,बिडगाव,खेडी, पांढरकवडा,पांढुर्ण, आडका,टेमसना,परसोडी,कुसुंबी, परसाड, केम, उमरी,कापसी बु,पोवारी रिठी,आसोली गावातील लाभार्थी लाभ घेतील. तसेच 1 व 2 जून ला कोराडी मंडळातील कोराडी येथील विठ्ठल रुखमाई देवस्थान सभागृहात हा उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये कोराडी,खापरीखेडा,सुरादेवी,खापा पाटण, बाबूलखेडा, तांदुळवाणी,चिचोली, लोंणखैरी,नांदा, गुंमथी, महादुला,पांजरा,म्हसाळा,कवठा वारेगाव ,बिना बिडबिना या गावातील लाभार्थी सहभागी राहतील तर या एक महिना च्या कालावधीत कामठी तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची जत्रा उपक्रमाचा समापन करण्यात येणार आहे.
या शासकीय योजनेच्या जत्रेत संजय गांधी निराधार योजना,वनविभाग,आरोग्य,पशुवैद्यकिय,पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, शिक्षण विभाग,कृषी विभाग ,नगर परिषद, नगर पंचायत आदी विभागातील महसूल प्रमाणपत्र,7/12 फेरफार, वनहक्क,माझी कन्या भाग्यश्री, बेबीकीट,सायकल वाटप,सायकल धनादेश वाटप,,विद्यार्थी उपस्थिती भत्ता प्रमाणपत्र,सुवर्ण महोत्सवी उपस्थिती भत्ता प्रमाणपत्र ,माती परीक्षण,जॉब कॉर्ड वाटप, ईश्रम कार्ड वाटप,आयुष्यमान भारत कार्ड वाटप,घरकुल लाभार्थी रॉयल्टी वाटप,घरकुल पूर्णत्व प्रमाणपत्र,संगायो सर्व योजना ,वीज जोडणी ,आधार अपडेट, चरित्र प्रमाणपत्र,ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र,सिंचन,जन्म मृत्यू ,विवाह नोंदणी प्रमाणपत्र आदी प्रकारचे प्रमाणपत्र वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रशासन ,शासन आणि जनता एकत्र आल्यास सामान्य जनतेच्या कोणत्याही समस्या शिल्लक राहू नये यासाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी एकच छताखाली सर्व अधिकारी जनता जत्रेच्या रुपात आणून जनतेला विविध योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.गावागावात या योजनांची माहिती दवंडी तसेच स्पीकरच्या माध्यमातुन नागरिकांना देणे सुरू असून ही योजना यशस्वी करण्यासाठी तालुका प्रशासनाचे कसोशिने प्रयत्न करीत आहेत.येत्या 3 मे ते 2 जून पर्यंत कामठी तालुक्यात होणाऱ्या या जत्रेत नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घावा असे आवाहन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले आहे.