संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील बालाजी सेलीब्रेशन हॉल डुमरी शिवारात नादुरूस्त उभ्या कोळसा ट्रक न दिसल्याने कंटेनर ट्रक ची रोड वर उभा कोळसा ट्रक ला मागुन जोरदार धडक झाल्याने या अपघातात कंटेनर ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याने कन्हान पोस्टे ला कोळसा ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.२८) ऑगस्ट ला पोलीस हवालदार प्रशातं रामटेके हे रात्रपाळी अधिका री सोबत मदतनीस म्हणुन ड्युटी करीत असतांना रात्री ११:३० वाजता दरम्यान पोस्टे एम.डी.टी डायल ११२ वर टोल नाका कन्हान येथील कर्मचारी राहुल मनगटे यांनी फोन करून सांगीतले की, बालाजी सेलीब्रेशन महामार्गावरील डुमरी शिवारात अपघात झाला आहे. अशा माहीती ने नापोशि प्रशांत रंगारी हे आपल्या सह कार्या सह घटनास्थळी पोहचुन तेथे बारकाईने पाहणी केली असता तेथे ट्रक क्र. एम एच ३४ ए बी २४४९ हा नादुरूस्त स्थितीत उभा दिसला असुन त्याचे ट्रक चाल काने सुरक्षेचे कोणतेही चिन्ह व रिफ्लेक्टर न लावता आपले वाहन महामार्गावर उभा ठेवल्याने नागपुर वरू न मनसर कडे जाणारा ट्रक कंटेनर क्र. एच.आर. ३८ झेड- २२३४ चा चालकाला रोड वर उभा असलेला ट्रक ला कोणतेही सुरक्षा चिन्ह न दिसल्याने मागुन येत जोरदार धडक झाल्याने चालक हा गंभीरपणे जख्मी होऊन घटनास्थळीच मरण पावला दिसल्याने पोलीसां नी मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्या दी प्रशांत परमेश्वर रंगारी यांच्या तक्रारी वरून पोस्टे कन्हान ला कोळसा ट्रक क्र. एम एच ३४ ए बी २४४९ च्या चालका विरूद्ध अप क्र. ५०५/२२ कलम २८३, ३०४ (अ) भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष क विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रशांत रामटेके हे पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.