अमेरिकन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

– भारत-अमेरिका संबंधांसाठी अमेरिकन काँग्रेस करत असलेल्या सातत्यपूर्ण आणि द्विपक्षीय सहकार्याची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

– पंतप्रधानांनी जूनमधील त्यांच्या ऐतिहासिक अमेरिका दौऱ्याची आठवण काढली ज्यात त्यांनी काँग्रेसला दुसऱ्यांदा संबोधित केले होते

– पंतप्रधान आणि अमेरिकन शिष्टमंडळाने यावेळी सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याप्रति आदर आणि दोन्ही देशांच्या जनतेमधील मजबूत संबंध अधोरेखित केले

नवी दिल्‍ली :- अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील आठ सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

शिष्टमंडळात इंडिया कॉकसचे डेमोक्रॅटिक सह-अध्यक्ष रोहित खन्ना, इंडिया कॉकसचे रिपब्लिकन सह-अध्यक्ष माइक वॉल्ट्ज, प्रतिनिधी एड केस, कॅट कॅमॅक, डेबोरा रॉस, जास्मिन क्रॉकेट, रिच मॅककॉर्मिक आणि ठाणेदार यांचा समावेश होता.

भारतात शिष्टमंडळाचे स्वागत करताना, पंतप्रधानांनी भारत-अमेरिका संबंधांना अमेरिकन काँग्रेसकडून दिल्या जात असलेल्या सातत्यपूर्ण आणि द्विपक्षीय समर्थनाची प्रशंसा केली.

अध्यक्ष बायडेन यांच्या निमंत्रणावरून जूनमध्ये केलेल्या अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्याची पंतप्रधानांनी आठवण काढली. या दौऱ्यात त्यांना अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला दुसऱ्यांदा संबोधित करण्याची संधी मिळाली होती .

भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याप्रति आदर आणि जनतेमधील मजबूत संबंधांवर आधारित असल्याचे पंतप्रधान आणि अमेरिकन शिष्टमंडळाने अधोरेखित केले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पद्म पुरस्कार-2024 के लिए नामांकन 15 सितंबर, 2023 तक खुले हैं

Thu Aug 17 , 2023
नई दिल्ली :- गणतंत्र दिवस, 2024 के अवसर पर घोषित किए जाने वाले पद्म पुरस्कार 2024 के लिए ऑनलाइन नामांकन/सिफारिश की प्रक्रिया 1 मई 2023 को शुरू हो चुकी है। पद्म पुरस्कारों के लिए नामांकन की अंतिम तिथि 15 सितंबर, 2023 है। पद्म पुरस्कारों के लिए नामांकन/सिफारिशें राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) पर ऑनलाइन प्राप्त की जायेंगी। पद्म पुरस्कारों यानी पद्म […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com