धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने दिल्‍लीत घेतली काँग्रेस नेत्यांची भेट

अमरावती :- माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने धनगर समाजाच्या मागण्या घेऊन समाजाचे नेते अ‍ॅड. दिलीप एडतकर यांच्या नेतृत्वात धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांसमोर धनगर समाजाच्या मागण्या मांडल्या.

नवी दिल्ली येथे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रवादी काँगेसचे शरदराव पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार इत्यादी नेत्यांच्या भेटी घेऊन धनगर समाजाच्या राजकीय व सामाजिक विषयावर चर्चा धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने केली.

याशिष्टमंडळामध्ये धनगर समाजाचे नेते अ‍ॅड. दिलीप एडतकर यांच्यासह नांदेड येथील यशपाल भिंगे, आदित्य फत्तेपूरकर (पंढरपूर), पुरुषोत्तम डाखोरे, रमेश पाटील (नागपूर), तसेच अमरावती येथील रमेशराव ढवळे, ज्ञानेश्वरराव ढोमणे, मनोज कचरे, प्रवीण मनोहर, अक्षय एडतकर, दर्यापूर येथून साहेबराव भदे व सदानंद नागे, बारामतीहून डॉ. शिवाजीराव देवकाते, पुणे येथून शंकरराव कोळेकर व तुषार रुपनर, तसेच मुखेडहून राजू पाटील सुरनर व इतर समाज बांधव उपस्थित होते. शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा यशस्वीरित्या पार पडला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प - जयदीप कवाडे

Sat Jun 29 , 2024
– महायुती सरकारचे पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे अभिनंदन नागपूर :- राज्यातील सर्वच घटकांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून शुक्रवारी सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारकडून शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com