डुमरी स्टेशन ला कोळसा ट्रकची दुचाकीला धडक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– अपघातात पती, पत्नी व नऊ वर्षाची मुलगी जख्मी. 

कन्हान :- महामार्गावरील डुमरी स्टेशन जवळ डुमरी कोळसा यार्ड मध्ये कोळसा भरून जाणा-या ट्रक ने कुठलेही सिगंल न देता निष्काळजीने ट्रक चालकाने ट्रक चालवुन दुचाकीला धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक, मागे स्वार त्याची पत्नी व नऊ वर्षाची लहान मुलगी जख्मी झाल्याने कन्हान पोलीसानी आरोपी ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.

बुधवार (दि.१६) ऑगस्ट ला दुपारी १२.३० वाजता दरम्यान श्री सुनिल फुले रा. हिवरा (गागनेर) ता. मौदा. जि. नागपुर हे पत्नी प्रिती व ९ वर्षाची लहान मुली सह पँशन प्रो दुचाकी क्र. एम एच ४० ए डी ६२१९ ने पत्नी चे माहेर रंगारी ठोका येथुन मनसर मार्गे आपले गावी गागनेर ला परत येत असताना नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर डुमरी स्टेशन चौकात कोळसा खदान येथुन कोळसा भरून डुमरी रेल्वे कोळसा यार्ड कडे जाणा-या कोळसा ट्रक चालकाने आपले वाहन वेगाने व निष्काळजीपणे कुठलेही सिगंल न देता रस्ता पार करताना दुचाकीला धडक मारल्याने दुचाकीसह तिघेही खाली पडुन जख्मी होऊन बेशुध्द झाल्याने तेथील लोकांनी १०८ च्या रूग्णवाहिकेने मेयो दवाखाना नागपुर येथे उपचारार्थ दाखल केले. परिवारातील अरूण फुले, सुरेश कडु, राजकुमार फुले यांनी पुढील उपचाराकरिता कामठी च्या खाजगी दवाखान्यात आणुन भर्ती केले. पत्नी प्रिती व मुलीला किरकोळ मार लागला असुन सुनिल फुले चा उजवा पाय फॅक्चर असुन डोक्याला व छातीला मार असल्याने त्याचा उपचार सुरू आहे. फिर्यादी पत्नी प्रिती सुनिल फुले वय ३२ वर्ष रा. हिवरा ( गागनेर) यांचा तक्रारी वरून कन्हान पोलीसानी आरोपी कोळसा ट्रक क्र.एम एच ४० ए के ५१८७ च्या चालका विरूध्द कलम २७९, ३३७, ३३८ भादंवि मो वा का १८४, १३४ अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवन येथे ‘माझी माती, माझा देश’ अभियानाची सांगता

Sat Aug 19 , 2023
२०४७ पर्यंत किमान पाच विद्यापीठे जागतिक स्तरावर आणण्याचे राज्यपालांचे आवाहन शासनाच्या प्रत्येक विभागाने पुढील २५ वर्षांसाठी उद्दिष्टे ठरविण्याची केली सूचना मुंबई :- स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाने पुढील २५ वर्षांकरिता आपली उद्दिष्टे निर्धारित करण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली. सन २०४७ पर्यंत राज्यातील किमान पाच विद्यापीठांनी जगातील १०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com