संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गवळीपुरा रहिवासी एका पानठेला चालकाने जीवाचे रान करून पै पै करीत सन 1997 मध्ये 9600 रुपयात 800 चौरस फूटचा प्लॉट घोरपड च्या ले आऊट मधून विक्री करून घेतला.या प्लॉट ची रजिस्ट्री करून देण्यासाठी प्लॉटविक्रेता कडे मागणी केली असता या प्लॉट विक्रेत्याने रजिस्ट्री लावून देण्यात असमर्थता दर्शवित उलट अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
अशाप्रसंगी या पीडित पानठेला चालकाला आपली फसवनुक झाल्याचे लक्षात येताच न्यायाच्या प्रतीक्षेत ऍड युवराज हुमने यांना आपबीती सांगितले असता ऍड हुमने यांनी कुठलाही लोभ व आर्थिक अपेक्षा न बाळगता सदर पीडित पानठेला चालकास न्याय मिळवुन देण्याचा ठाम निश्चय करून कामठी न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ केले ज्यावरुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कामठी न्यायालयाने सी आर पी सी कलम 156(3) प्रमाणे दिलेल्या आदेशावरून फसवणूक करणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीमध्ये राजेंद्र यादव वय 50 वर्षे व अनंतलाल यादव वय 65 वर्षे दोन्ही राहणार यादव नगर कामठी असे आहे.
आयुष्यात प्रत्येकाला आपल्या निवाऱ्याची सोय करावी लागते याची सुरुवात एखादा प्लॉट वा घर घेतल्यापासून केली जाते.आपल्या आयुष्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करून पै पै करीत गोळा केलेल्या पैस्यातून प्लॉट खरेदी केला जातो मात्र अशा बिकट परिस्थितीतून खरेदी केलेला प्लॉट हा स्वमालकीचा होत नसून उलट फसवणूक झाल्याचा प्रकार घडत असेल तर पुढे काय?असा प्रश्न उभा राहतो अशा प्रसंगी न्यायालयीन लढा हा एक पर्याय असतो .असाच प्रकार कामठी येथील गवलीपुरा परिसर रहिवासी विष्णू यादव व्यवसायाने पांनठेला चालक यांच्याशी घडला असून यांनी न्यायाच्या हक्कासाठी न्यायालयीन पायरीची कास धरत ऍड युवराज हुमने यांचा आश्रय घेतला आणि ऍड युवराज हुमने यांच्या तर्कशक्ती वकिलीमुळे न्यायालयाने न्यायिक बाजूने न्याय देत प्लॉट विक्री च्या नावावर फसवणूक करणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला.
प्राप्त माहितीनुसार स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गवळीपुरा रहिवासी विष्णू यादव यांनी सन 1997 मध्ये 9600 रुपयात 800 चौरस फूटचा प्लॉट घोरपड च्या ले आऊट मधून विक्री करून घेतला.या प्लॉट ची रजिस्ट्री करून देण्यासाठी प्लॉटविक्रेता कडे मागणी केली असता या प्लॉट विक्रेत्याने रजिस्ट्री लावून देण्यात असमर्थता दर्शवित उलट अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
प्राप्त माहितीनुसार स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजा घोरपड येथील प.ह. नं.18 येथील खसरा नं 248 या शेतीतील परवेज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाच्या ले आऊटमधील 800 स्क्वेअर फूट चा प्लॉट नं 55 हा किमती 9 हजार 600 रुपयात सन 1997 मध्ये फिर्यादी विष्णू यादव यांनी मुलगी नीलम यादव ही 8 वर्षाची असताना तिच्या नावाने आरोपी राजेंद्र यादव गवळीपुरा कामठी यांच्याकडून 500 रुपये इसार देऊन सौदा केला होता व उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने नगदी स्वरूपात राजेंद्र यादव यांच्या कार्यालयात जमा केले. यासंदर्भात सदर प्लॉट ची रजिस्ट्री लावून देण्याबाबत विचारणा केली असता आरोपीने सदर फिर्यादी इसमास शिवीगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिली व दुसरीकडे प्लॉट देतो असे म्हणून प्लॉट धारकाकडे असलेले सर्व कागदपत्रे जमा करून घेतले मात्र प्लॉट दिला नाही उलट आरोपी राजेंद्र यादव व अनंतलाल यादव यांनी खोटे व बनावटी दस्तावेज बनवून त्याचा वापर करून प्लॉट धारकाची विश्वासात घेऊन काटकरस्थानाने फसवणूक केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.यासंदर्भात पीडित प्लॉट धारकाने प्रसिद्ध वकील ऍड युवराज हुमने यांच्याकडे न्यायाची मागणी केली असता ऍड युवराज हुमने यांनी न्याय मिळवून देण्याचा ठाम निश्चय करून कायदेशीर रित्या कामठी न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.या अर्जावरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कामठी न्यायालयाने सी आर पी सी कलम 156(3) प्रमाणे दिलेल्या आदेशावरून आरोपी राजेंद्र यादव वय 50 वर्षे व अनंतलाल यादव वय 65 वर्षे दोन्ही राहणार गवलीपुरा कामठी विरुद्ध भादवी कलम 420,467,468,471,406,504,506,120(ब)प्रमाणे काल गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अजूनही अटकेबाहेर आहेत.तर या प्रकारे असे अनेक प्लॉट धारकांचो फसवणूक झाल्याची माहिती असून अजून 18 प्रकरणे दाखल होणार असल्याची माहिती ऍड युवराज हुमने यांनी सांगितले.