घरफोडी करणाऱ्या नोकराविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत प्लॉट नं. ४, धरमपेठ हाऊसिंग सोसायटी, दिनदयाल नगर येथे राहणारे फिर्यादी अरविंद मुरलीधर नागले वय ७१ वर्ष हे आपले राहते घराला कुलूप लावुन परिवारासह पुणे येथे नातेवाईकाचे घरी गेले असता त्यांचे शेजारी राहणारे यांनी त्यांना घराने दाराचे कुलूप तुटल्याचे व चोरी झाल्याचे सांगीतले. फिर्यादी यांनी येवून पाहणी केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीने घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन घरातील एच.पी, डेल व लेनोवो कंपनीचे तिन लॅपटॉप, सोन्याचे टॉप्स अमेरीकन डॉलर व रोख ८८,०००/- रू असा एकुण १,८३,०००/- रू चा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसले.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे सपोनि चौधरी यांनी आरोपीविरूध्द कलम ३३१(३), ३३१ (४), ३०५ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध व पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

करोडोंची फसवणुक करणा-या महिला डॉक्टरला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Tue Jul 16 , 2024
नागपूर :- यातील आरोपी सुरज सावरकर हा आय एक्स ग्लोबल (IX ACADEMY PRIVATE LIMITADE) कंपनीत ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडींग, शेअर्स मार्केट, क्रिप्टो मार्केट यांचे एज्युकेशन देण्याचे काम करत असुन यातील फिर्यादी व फिर्यादीचे मित्रांना ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडींग मध्ये गुंतवणुक केल्यास ५ ते १५ टक्के नफा मिळतो. अशी बतावणी करून आरोपीने दिलेल्या पि.आर. ट्रेडर्स, एम. आर. ट्रेडर्स, आर. के. ट्रेडर्स, ग्रिन व्हॅलीअॅग्रो, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com