मौदा :- फिर्यादी व आरोपी १) युवराज बाळकृष्ण बचाले, वय ३५ वर्ष य. चिकना २) ०२ महिला आरोपी हे एकाच गावात राहत असून फिर्यादी यांचे एकमेकासोवत चांगले पटत होते व बोलणे चालणे होते फिर्यादीचे पतीने आरोपींकडून १०००००/- रूपये पैसे उसने मागीतले होते व सदर रक्कम परत सुध्दा केले होते. गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार पडली होती. आरोपी क. १ यांची पत्नी सरपंच पदाकरीता उभी होती, तिचा निवडणूकीमध्ये पराभव झाला तो राग मनात ठेवून दि. 10/11/2023 चे 09/00 वा. ते 09/15 वा. दरम्यान फिर्यादी ही घरी हजर असतांनी व तिचे पती व मुल घरीच हजर होते. युवराज वाचाले हा घरी आला व पैशाच्या मागणीवरून वादविवाद करू लागला, त्यावर फिर्यादीचे पतीने आरोपी क. १ याला तुझे पैसे मी परत केले तु मला पैसे मागू नको असे म्हटले असता फिर्यादीच्या पतीसोबत झगडा भांडण करून शिवीगाळ करू लागला, त्यावेळी फिर्यादीने भांडणाचा आवाज आल्यामुळे हॉलमध्ये मध्यस्थी करण्याकरीता गेली असता ०२ महिला आरोपी या सुदधा फिर्यादीच्या अंगावर धावून आले. व शरीरावर नको त्याठिकाणी स्पर्श करून फिर्यादीला लज्जा वाटेल असे हिला घराच्या बाहेर ओढ असे बोलून ओढताण करून मंगळसुत्र ओढून तोडले व शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी दिली. व फिर्यादीच्या पतीला एकटा रस्त्यात भेटला तर त्याला जिवाने ठार मारू असे बोलले.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. मौदा येथे आरोपीतांविरुध्द कलम ३५४, ५०४, ५०६, ३४ भादंवि कायदयान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सफौ असलम नवरंगाबादे बनं, 171 मो क. हे करीत आहे