घरफोडी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल..

 पो.स्टे. नरखेड :- अंतर्गत ०५ कि.मी. अंतरावरील बेलोना येथे दिनांक १२/०६/२०२३ चे रात्री ०.०० वा. ते दिनांक १३/०६/२०२३ मे ०३.०० वा. रात्री दरम्यान फिर्यादी नामे-  प्रतिभा योगेश मोरसे, वय ३५ वर्ष, रा. मौजा बेलोना, ता. नरखेड ही दिनांक १२/०६/२०२३ रोजी आपले परीवारासह जेवण करून रात्री १२/०० वा. दरम्यान सर्व जण झोपी गेले होते दि. १३/०६/२०२३ रोजी रात्री ०२/४५ ला फिर्यादीला जाग आली असता घरातील लाइट बंद दिसले, फिर्यादी व फिर्यादीचे पती दोघेही उठून किचन रूममध्ये ठेवलेले लोखंडी कपाटाचे दार उघडे दिसले व कपाटातील सामान अस्ताव्यस्त खाली पडलेले दिसले तसेच फिर्यादी हिने किचन ओट्यावर पडुन असलेल्या पर्समध्ये पाहिले असता त्या पर्समध्ये ठेवलेले १) सोन्याचे २० ग्रॅमचे लॉकेट किंमती प्रत्येकी ३०००/- रू. प्रमाणे एकुण ६०००० /- रू तसेच २) सोन्याचे एक ७ ग्रामची गोल मन्याची पोच किमती प्रत्येकी ३०००/-रू ग्राम प्रमाणे एकुण २१०००/- रु ३) सोन्याचे एक ७ ग्रॅमची गोल मन्याची पोथ किंमती प्रत्येकी ३००० /- रु ग्रॅम प्रमाणे एकूण २१०००/-रु. ४) एक सोन्याची ०५ ग्रॅमची बदामी अंगठी प्रत्येकी २५००/- रू प्रमाणे १२५००/- रु. व नगदी २०००/- रु असा एकूण १,२३,५००/- रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. नरखेड येथे आरोपीविरुध्द कलम ४५७, ३८० भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राम शंकरराव ढगे, पोस्टे नरखेड हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अतिप्रसंग करणारा आरोपी अटकेत

Thu Jun 15 , 2023
पो.स्टे. बुट्टीबोरी :- दिनांक १७/०१/२०२३ चे १०.०० वा. ते १४.०० वा. सुमारास पिडीत मुलगी व आरोपी नामे- संजय आत्माराम तायडे, वय ५२ वर्ष ते एकमेकांचे घरा शेजारी राहत असुन यातील पिडीत मुलगी तिचे घरी एकटीच हजर असतांना यातील आरोपीने फिर्यादीचे घराचे मागील दरवाज्यातुन घराचे आत जावुन घराचा समोरचा व मागचा दरवाजा आतून बंद केला आणि फिर्यादीचा हात पकडुन ओरडु नकोस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com