घरफोडी करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. २२६. जय जलाराम नगर, वाठोडा, नागपुर येथे राहणारे फिर्यादी मोहन गोविंदराव बावनकर, वय ६३ वर्षे, हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन परीवारासह नातेवाईकाकडे चंद्रपुर येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्‌याने फिर्यादीचे घराचे दाराचे कुलूप तोडुन, घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी आलमारीतील सोन्याचे दागिने व रोख ८०,०००/- असा एकूण किंमती २,५४,०००/- रू. मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि चव्हाण यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५४, ४५७, ३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुख्यात गुंड स्थानबध्द

Wed Jun 19 , 2024
नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक १८/०६/२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे लकडगंज, शांतीनगर, नंदनवन, राणाप्रतापनगर व यशोधरानगर, नागपूर ने हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे प्रदीप उर्फ चिनी वल्द ध्रुवसिंग थापा, वय ३५ वर्ष, रा. तुळशीनगर, घाट चौक, पोलीस ठाणे शांतीनगर, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com