नागपूर :- आदिवासी समाजाचे जननायक शहीद बिरसा मुंडा यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात आज साजरी करण्यात आली. यावेळी उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार नितीन गौर यांनी शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.