नागपूर :- गुन्हेशाखा पोलीसांना खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत सिएमपीडीआय रोड, हनुमान मंदीर मागे, ईटारसी पुलीया जवळ, जरीपटका येथे जुगार अड्डा सुरू आहे, अशा मिळालेल्या माहितीवरून नमुद ठिकाणी रेड कारवाई केली असता त्या ठिकाणी पैसे देवुन क्वाईन विकत घेवुन त्याचा वापर करून जुगार खेळणारे १) जयकुमार कोदुमल कंजवानी २) बंदु वासुमल रामनिवास ३) प्रकाश श्रावणजी कांबळे ४) राजकुमार दिपचंद सचदेव ५) रविन्द्रसिंग कुलदीपसिंग बिंद्रा ६) पवन मोहनलाल वाधवानी ७) अनिल चंद्रलाल गुरबचानी ८) सागर रामदास गुरबानी ९) नरसो सेउमल वासवानी १०) शरद सर्व रा. जरीपटका, नागपूर हे समक्ष मिळून आले. आरोपींचे ताब्यातुन रोख १०,५००/- रू. विवीध कंपनीचे ०९ मोबाईल फोन, एक दुचाकी वाहन, ताश पत्ते, वेगवेगळया रकमा लिहीलेल्या क्वाईन व ईतर साहीत्य असा एकुण १,४६,५००/- रू या मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपीविरूध्द पोलीस ठाणे जरीपटका येथे पोहबा, राजेश देशमुख गुन्हेशाखा यांनी दिलेल्या तकारीवरून आरोपोंविरूध्द कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पुढील कारवाईस्तव मुद्देमालासह जरीपटका पोलीसांचे ताब्यात घेतले.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त, नागपुर शहर, सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) व सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि, मयुर चौरसिया, पोहवा, राजेश देशमुख, रवि अहीर, प्रशांत गभने, श्रीकांत उईके, नापोअं. निलेश श्रीपात्रे, पो.अं. आशिष वानखेडे व सुधिर पवार यांनी केली.