नागपूर :- पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत प्लॉट नं. १६६, लक्ष्मीनगर, महाजनवाडी, वानाडोंगरी, हिंगणा रोड, नागपुर येथे राहणारे फिर्यादी नामे नाना मोतीराम खाडे वय ५६ वर्ष यांचे बँक ऑफ बडोदा हिंगणा, नागपूर ब्रांच व एच.डी.एफ.सी बैंक रामटेक येथे अकाउंट आहे व त्यांचे अकाउंट हे त्यांचे मोबाईल नंबर सोबत लिंक आहे. दिनांक २६.०५.२०२४ चे २२.०० वा. ते दि. ११.०६.२०२४ चे २२.०० वा. चे दरम्यान फिर्यादी हे त्यांचे परिवारासह केदारनाथ यात्रे करीता गेले होते. यात्रे दरम्यान त्यांचा मोबाईल नादुरूस्त झाल्याने बंद पडला होता. फिर्यादी यात्रेवरून परी परत आल्यावर त्यांनी त्यांचा मोबाईल दुरूस्ती करून सुरू केला असता, त्यांना समजले की, अज्ञात आरोपीने फिर्यादीचे दोन्ही बँकेचे खात्यातुन आरोपीचे वेगवेगळ्या खात्यावर फिर्यादीचे संमतीशिवाय एकुण १८,३०,६३१/- रू ऑनलाईन ट्रान्सफर करून फिर्यादीची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तसेच, अर्जाचे चौकशीवरून पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. येथे पोउपनि, आरवेल्ली यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भा.द.वि. सहकलम ६६(क), ६६ (ड) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.